spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विजयस्तंभ भीमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा, अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत

भीमा कोरेगाव एक ऐतिहासिक पुरावा. तुम्ही शूरवीरांची संतान आहेत. हि गोष्ट काल्पनिक नाही. तर तिथे जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची तिथे नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली असतील.

महाराष्ट्रातील कलाकार (Actors) प्रेक्षकांची करमणूक (Entertainment) करण्याबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय (Political) आणि इतर महत्वाच्या विषयांवर देखील आपलं मत सोशल मीडिया (Social Media) च्या माध्यमातून मांडताना आपल्याला दिसतात. नुकतीच अरुण कदम (Arun Kadam) यांची एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. अरुण कदम हे “महाराष्ट्राची हास्यजत्रा” (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमा (Comedy Show)तून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या आगरी बोलण्याच्या शैलीमुळे ते नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि चर्चेचा विषय असतात. परंतु आज त्यांची एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. ज्यामध्ये अरुण कदम यांनी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) घटनेवर मत मांडताना दिसत आहेत. हि पोस्ट चांगलीच व्हायरल होताना पाहायला मिळतंय.

अरुण कदम यांनी भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी २५ डिसेंबर १९२७ (27 December 1927) महाड (Mahad) येथे केलेल्या भाषणातील एक विधान आहे. ज्यामध्ये “भीमा कोरेगाव एक ऐतिहासिक पुरावा. तुम्ही शूरवीरांची संतान आहेत. हि गोष्ट काल्पनिक नाही. तर तिथे जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची तिथे नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली असतील. तो पुरावा आहे कि, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात,”असे लिहिले आहे. आणि त्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर , दिनांक २५ डिसेंबर १९२७, महाडचे भाषण असे लिहिले आहे.

त्याचबरोबर या पोस्ट अरुण कदम यांनी ,”जिथे काही कलाकार बाबासाहेबांचे विचार कितीही पटत असले तरी त्याविषयी उघडपणे बोलत नाहीत. कारण खूप खोलवर रुजलेली जातीव्यवस्था . पण ज्यावेळी आपल्या सारखे कलाकार गौरवोद्गार काढतात त्यावेळी खरंच आपले कौतुक करावे वाटते आणि आपण दाखवलेल्या धाडसाला हा वंचित समाज कधीच विसरणार नाही, याची खात्री असू द्या,”हे कॅप्शन (Caption) दिले आहे.

हे ही वाचा:

“तुम्ही ड्रायव्हर घेऊ शकता”, कार अपघातानंतर कपिल देव यांचा ऋषभ पंतला संदेश

अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला तिचा ग्लॅमरस लुक

या व्हिडिओने केली कपिल शर्माची पोलखोल, टेलिप्रॉम्पटर वापरून करतो कॉमेडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss