आर्यन खानचे सिनेसृष्टीत पदार्पण, सोशल मिडीयावर पोस्ट करत केला खुलासा

आर्यन खानचे सिनेसृष्टीत पदार्पण, सोशल मिडीयावर पोस्ट करत केला खुलासा

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा मागील एक वर्षापासून प्रचंड चर्चेत आहे. एका क्रूज पार्टीमध्ये ड्रग्स आढळले होते. आणि त्या पार्टीत आर्यन खान सुद्धा सहभागी होता. त्यामुळे आर्यनवर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली होती. या प्रकरणामुळे तो सगळीकडे चर्चेत आला होता. नेटकऱ्यांनी आर्यनवर ना- ना प्रकारचे आरोपही केले होत. आर्यन खान हा सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतो. तो कोणत्याही कार्यक्रमांमध्ये गेला असला तर त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतो. पण आता सध्या आर्यन खान हा त्याच्या एका पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आर्यन खानाने केलेल्या पोस्टमध्ये असे दिसून येत आहे की, तो सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून नाही दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे.

आर्यन खानला गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणी एक महिना तुरुंगवास भोगावा लागला होता. आर्यनचे वडील शाहरुख खान हा फक्त अभिनेता नसून मोठा निर्माता आणि उद्योजक देखील आहे. तेवढच नाही तर शाहरुख खान हा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणूनच आर्यनच्या अटकेची चर्चा भारतातच नाही तर जगभरात झाली होती. नुकताच आर्यन खानाने त्याच्या इंस्टाग्रामवरील अधिकृत खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत जात असल्याचे सांगितले. एका बाजूला हातात स्क्रिप्ट असून दुसऱ्या बाजुला ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ लिहिलेला क्लिपबोर्ड दिसत आहे. आर्यनच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘लेखन पुर्ण झाले आहे. अँक्शन करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे.’ आर्यनच्या या पोस्टवर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आणि विशेष म्हणजे त्याची आई गौरी खान (Gauri Khan) आणि वडील शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी कंमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता शाहरुख खान याने कमेंट केली आहे की व्वा.. विचार केलास …. विश्वास केलास … स्वप्न पूर्ण झालं …. आता धाडस कर …. तुझ्या पहिल्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा… पहिला प्रोजेक्ट हा कायम खास असतो. असे लिहीत त्याने आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत. तर गौरी खानने लिहिले आहे की, पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.अशा प्रकारे दोघांनीही आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनीही आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यन रेड चिली एंटरटेनमेंट अंतर्गत एका मालिकेवर (series) काम करत आहे.

हे ही वाचा : 

सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महिलांनी अनुभवला पैठणीचा नक्षीदार प्रवास

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटक बँकच्या फलकाला फासलं काळं

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत नाहीतर चोक उत्तर दिल जाईल, शंभूराज देसाईंचा इशारा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version