spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asha Bhosle Birthday: चिरतरुण आवाजाची दैवी देणगी असलेल्या ‘आशा भोसले’ यांच्याविषयी जाणून घेऊयात…

आशा भोसले या एक दिग्गज भारतीय पार्श्वगायिका आणि उद्योजक आहेत. ज्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत उद्योगात कार्यरत आहेत . आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथील गोवर येथे झाला.

Asha Bhosle Birthday: आशा भोसले या एक दिग्गज भारतीय पार्श्वगायिका आणि उद्योजक आहेत. ज्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत उद्योगात कार्यरत आहेत . आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथील गोवर येथे झाला. उषा मंगेशकर(Usha Mangeshkar), हृदयनाथ मंगेशकर (Hrudaynath Mangeshkar)आणि मीना खडीकर (Meena Khadikar)या भावंडांमध्ये आशाताई मोठ्या आहेत. आशा ताईंनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी गायनाची सुरुवात केली. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये १२०० हून अधिक गाणी गायली आहेत आणि उद्योगातील काही नामांकित संगीत दिग्दर्शकांसोबत कामही केले आहे. आशा भोसले यांच्या काही लोकप्रिय गाण्यांमध्ये “आँखों की मस्ती,” “कजरा मोहब्बत वाला,” आणि “पिया तू अब तो आजा” अश्या काही गाण्यांचा समावेश आहे.

आशा ताईंच आयुष्य नेहमी वादळी आणि आव्हानात्मक ठरलं आहे परंतु आशा भोसले त्यांच्या हटके गायन शैलीने आणि विविध गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आणि हृदयावर आजही राज्य करत आहेत. त्यांची गाणी मनात घर करणारी आणि आपलंसं करणारी ठरली. एक असा काळ होऊन गेला आहे जेव्हा आशा ताईंनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले आहे.

वैयक्तिक आयुष्य( Personal Life)
आशा भोसले यांचे दोनदा लग्न झाले आहे. पहिले लग्न गणपतराव भोसले(Ganpat Bhosle) यांच्याशी झाले होते जे १९४९ ते १९६०सालापर्यंत आणि नंतर दुसरे लग्न १९८० ते १९९४ मध्येआर . डी.बर्मन (R.D.Barman) यांच्याशी त्यांचा मृत्यू होईपर्यंत. आशा भोसले यांना तीन मुले आहेत. तसेच त्यांना स्वयंपाक करण्याचाही छंद आहे.

आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह संगीतातील योगदानासाठी अनेक पुरस्कार, सन्मान आणि प्रशंसा प्राप्त झाल्या आहेत.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss