Ashirwad Tuza Ekveera Aai सोनी मराठीवरील नवीन मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस

Ashirwad Tuza Ekveera Aai सोनी मराठीवरील नवीन मालिका उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस

छोट्या पद्यावरील मालिकाविश्वात सध्या निर्माते वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेकदा काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अशीच एक सोनी मराठीवर (Sony Marathi) उद्यापासून ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Ashirwad Tuza Ekveera Aai)

हेही वाचा : 

Bigg Boss 16 तुम्ही महान दिग्दर्शक व्हाल पण तुम्ही बिग बॉस चालवू शकत नाही ; सलमान खानाने केली साजिद वर टीका

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत एकवीरा आईच्या भूमिकेत अभिनेत्री मयूरी वाघ (Mayuri Wagh) दिसणार आहे. तर अमृता पवार (Amruta Pawar) देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मयूरीने अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. मात्र या मालिकेत ती चक्क आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकारांनी देवीच्या मूळ स्थानी म्हणजेच कार्ला येथे जाऊन एकवीरा आईचे दर्शन घेतले.

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील कलाकारांनी कार्ला (Lonavala) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड – सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

HTET 2022 हरियाणा शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र ‘या’ वेबसाईट वर उपलब्ध, जाणून घ्या कसे डाउनलोड कराल

मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणाली, या मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेत. अनेकांनी ते अनुभवले आहेत. संकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पाहायलाही मिळणार आहेत. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराला वाटत. आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होत. त्याच वेळेस एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आली. यामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारन ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकवीरा आईच्या भक्तांना ही मालिका आवडेल अशी अपेक्षा आहे”.

एकवीरा आई (Ekvira Aai) मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. आगरी- कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

‘या’ मुद्यावरुन जनता भाजपचा पराभव करेल, संजय राऊत

Exit mobile version