‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून Ashok Saraf यांचे टेलिव्हिजनवर कमबॅक

अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. मधल्या काही काळासाठी ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा छोट्या पडद्यावर त्यांचे कमबॅक होणार आहे.

‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून Ashok Saraf यांचे टेलिव्हिजनवर कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपले स्वतःचे स्थान निर्माण करणारे तसेच विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. मधल्या काही काळासाठी ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा छोट्या पडद्यावर त्यांचे कमबॅक होणार आहे.

मराठी टेलिव्हिजनच्या पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येत आहे. “येतोय महाराष्ट्राचं महानायक लवकरच” असं म्हणत कलर्स मराठीने मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अशोक मा. मा. या मालिकेचा प्रोमो पाहताक्षणी काहीतरी गूढ, थरारक असल्याचं दिसत आहे. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक सराफांची व्यक्तिरेखा दिसत आहे. तसेच शिस्त म्हणजे शिस्त हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या विनोदी अंदाजाने ते सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहेत. प्रोमोतल्या शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये अशोक मा. मा. असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि या मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव हे सारखंच आहे. अशोक सराफ यांच्यासोबतच आणखी कोणते कलाकार या मालिकेत असणारा आहे याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.

अशोक मा. मा. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या मालिकेबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले की, “मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल”. अशोक मा.मा. या मालिकेत नक्की काय पहायला मिळणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

Exit mobile version