मराठी सिनेसृष्टीत गाजलेला नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला प्रेक्षकांनी २० वर्षांपुर्वी भरभरुन प्रतिसाद दिला.या चित्रपटातील निम्यापेक्षा जास्त शुटिंग हे बस मध्ये करण्यात आलं .कोकणाच्या निसर्गरम्य ठिकाणावर हा चित्रपट शुट करण्यात आला.आता या चित्रपटाच्या यशानंतर नवरा माझा नवसाचा भाग २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘नवरा माझा नवसाचा 2′ या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिलं आहे,”नवरा माझा नवसाचा 2’ शूटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या”.
जयवंत वाडकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.या चित्रपटात पुन्हा तिच कास्ट असावी अशी इच्छा देखील नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.ही पोस्ट पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उस्तुकत्ता लागली आहे.
‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटात अशोक सराफ यांच्या कॉमेडीचा धमाका सगळ्यांनीच पाहिला.या सिनेमात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर अशोक सराफ ,सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार? या सिनेमाचं कथानक काय असेल? या चित्रपटाचे शुटिंग कुठे असेल?याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सचिन पिळगावकर या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सिनेमातील चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांची ओढ प्रेक्षकांना आजही आहे.प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला होता.दरम्यान आता हा दुसरा भाग मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा गाजवण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत.
हे ही वाचा:
फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट
आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे : रामदास कदम