अभिनेत्री इशा गुप्ताचा ‘लग्न न करण्याच्या’ निर्णयावरून व्हायरल झाला व्हिडिओ

एका व्हिडिओ मध्ये ईशा ने पापाराझी ला दिलेल्या उत्तराचा हा विडिओ तुफान व्हायरल होतोय.M

अभिनेत्री इशा गुप्ताचा ‘लग्न न करण्याच्या’ निर्णयावरून व्हायरल झाला व्हिडिओ

‘आश्रम ३’ या वेबसीरीज मध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या अभिनयामुळे सध्या खूप चर्चेत आहे. ‘आश्रम ३’ मध्ये ईशाने साकारलेल्या सोनिया या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळतेय. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतेय. एका व्हिडिओ मध्ये ईशा ने पापाराझी ला दिलेल्या उत्तराचा हा विडिओ तुफान व्हायरल होतोय. कारण त्यात ईशाने लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

लग्न न करण्याच्या या प्रतिक्रियेमुळे ईशाच्या या विडिओ खाली नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ईशा ला एका क्लिनिक बाहेर पडताना पापाराझी ने गाठलं. तेवढ्यात एक फोटोग्राफर ईशाला त्याचा मित्र लग्न करू इच्छित नाही असं सांगत आहे. त्यावर ईशा बोलताना दिसतेय-”का करेल बिचारा लग्न?”

त्यावर ईशा पुन्हा म्हणतेय खरंच का करेल तो लग्न ? मी पण लग्न करणार नाही”. ईशाच्या या व्हिडीओ खाली अनेकांनी कमेंट मध्ये ‘आश्रम’ मधील डायलॉग लिहिला आहे. एक युझर ने लिहिलंय,’ जप नाम जानू कह रहा है’, तर एकाने ‘मोंटी बाबा की जय’ असे लिहिले आहे.

Exit mobile version