spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आई कुठे काय करते फेम अश्विनी मंहागडेने व्यक्त केली राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा

कलाकार मंडळी ही राजकारणाकडे आपली पावलं टाकत असल्याचे अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत.

कलाकार मंडळी ही राजकारणाकडे आपली पावलं टाकत असल्याचे अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत.अशातच आता आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहचलेली अश्विनी मंहागडेने एक वक्तव्य केलं आहे.ज्यामुळे ती चर्चेत आली आहे,तस तर अश्विनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.अनेकदा अश्विनी राजकीय किंवा सामाजिक विषयांवर आपले मत मांडताना दिसून येत असते.दरम्यान आता अश्विनी राजकारणात येणार असल्याची सध्या चर्चा आहे.अश्विनी महांगडे अभिनयासह समाजकार्यातही सक्रीय आहे. ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या माध्यमातून ती अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

एका वृत्तवाहिनला मुलाखत देताना अश्विनी म्हणाली,”संधी मिळाली तर नक्कीच मी विचार करेन. कारण “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, जे द्यायला हवे”, हा ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ या आमच्या सामाजिक संस्थेचा विचार आहे. मी आज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मला जसे जमेल तसे समाजासाठी काम करत आहे. आणि राजकारणामुळे मला माझा समाजाप्रती कामाचा आवाका वाढवता येणार असेल तर मला ते करायला नक्की आवडेल”. अश्विनी पुढे म्हणते,”मुळातच मी एक मतदार आहे आणि मतदार हा राजकारणातील सगळ्यात मोठा भाग मानला जातो त्यामुळे मीच काय कोणीही असे बोलत असेल की माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही तरी तो माणूस राजकारणात आहे. कारण तो एक मतदार आहे. त्यामुळे मी आधीपासूनच राजकारणात आहे”.

सध्याच्या राजकारणावर अश्विनी म्हणते,”सध्याचे राजकारण फार भयानक वाटतेय. प्रत्येक पक्षाचे त्याचे त्याचे असे विचार असतात आणि पक्ष त्याप्रमाणेच काम करत असतो. आता कोण कोणती विचारधारा स्वीकारतो, स्वीकारेल हेच समजेनासे झाले आहे. मला तरी एक मतदार म्हणून असे वाटतेय की आताचे जे राजकारणी आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. ही भीती नेमकी कसली आहे हे आपण वेगळे सांगायची गरज नाही. लोकशाही टिकेल का? हा प्रश्न माझ्या सारख्या अनेक तरुण तरुणींना पडत असेलच की”.

अश्विनी पुढे म्हणाली,”राजकारण वाईट आहे असं म्हणत बसलो तर ते तसेच राहील. त्यात उतरून काम केल्याशिवाय मार्ग नाही. लोकशाही टिकवायची तर समाजातील तरुण तरुणींनी पुढे येवून काम करायला हवे. राजकारणात संधी मिळाली तर शेतमालाविषयी, त्याच्या आयात निर्याती विषयी जी धोरणं आहे त्यात बदल करायला आवडेल, असे अनेक मुद्दे आहेत जे मला आता मतदार म्हणून खटकत आहेत आणि त्यावरच काम करायला हवं”.अशा पद्धतीत कणखर मत अश्विनीने मांडले आहे.सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे.प्रेक्षक देखील अश्विनीच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत.

हे ही वाचा:

कडक उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी घरच्या घरी बनवा फ्रेश लेमन सोडा

विजय शिवतारे बारामती लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार,बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss