spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Anant Ambani – Radhika Merchant यांच्या एंगेजमेंट पार्टीत, १० मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी Mika Singh ने घेतले ‘इतके’ रूपये !

खास प्रसंग कसा साजरा करायचा हे अंबानी कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे! दिग्गज व्यावसायिक अंबानी कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लेक ईशा अंबानी (Isha Ambani) पहिल्यांदाच तिच्या जुळ्या मुलांना घेऊन भारतात आली आहे.

खास प्रसंग कसा साजरा करायचा हे अंबानी कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे! दिग्गज व्यावसायिक अंबानी कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लेक ईशा अंबानी (Isha Ambani) पहिल्यांदाच तिच्या जुळ्या मुलांना घेऊन भारतात आली आहे. घरी आल्यावर तिचा जंगी स्वागत करण्यात आलं. आता त्या पाठोपाठ ईशाचा जुळा भाऊ म्हणजेच उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटशी (Anant Ambani – Radhika Merchant) नुकताच साखरपुडा (engagement) संपन्न झाला. राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघे जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं गेलं. संध्याकाळी एंटीलियामध्ये जंगी पार्टी रंगली. या कार्यक्रमाची जितकी चर्चा होती तितकीच चर्चा आता या कार्यक्रमातील मिका सिंगच्या Mika Singh) गाण्याची होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राजस्थानातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघे गुरुवारी संध्याकाळी मुंबईला परतले. त्यांचे स्वागत त्यांच्या प्रियजनांनी फुले, फटाके, ढोल वाजवून आणि पंजाबी गायक मिका सिंगच्या सादरीकरणाने केले. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मिका सिंगने आपल्या खास अंदाजात या कपलचं वेलकम केलं. यावेळी मिका सिंगने १० मिनिटांचा परफॉर्मन्स केला. या १० मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मिकाने किती कोटी घेतले माहितीये? मीडिया रिपोर्टनुसार,मिका सिंगने या १० मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल १.५ करोड रुपये आकारले होते. सोशल मीडियावर मिकाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यानंतर , मुकेश अंबानी यांनी मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. काल रात्री शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग या बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली. जान्हवी कपूर, अयान मुखर्जी, मीझान जाफरी, सागरिका घाटगे, अरमान जैन आणि ऑरी अवत्रामणी हे देखील अँटिलिया येथे पोहोचताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 दरम्यान अनंत आणि राधिका अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात राधिका आवर्जून उपस्थित राहते. अनंतने अमेरिकेच्या ब्राऊन विश्वविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. रिलायन्स इंडस्ट्रीत जियो आणि रिलायन्स रिटेल वेंचर्सवर बोर्ड सदस्यच्या रुपात त्यानं विविध पदांवर काम केलं आहे. सध्या तो आरआईएल चा प्रमुख म्हणून काम पाहतो आहे. राधिका न्यूयॉर्क विश्वविद्यालयात शिकली आहे आणि एनकोर हेल्थकेअर बोर्डाची संचालक आहे. सध्या त्यांच्या साखरपुडाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. त्याचप्रमाणे आता मिका सिंगने या सोहळ्यात गाण्यासाठी घेतलेल्या मानधनाच्या आकड्यानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

 

हे ही वाचा:

Narendra Modi’s mother Hiraben Modi passed away नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी घेतला अखेरचा श्वास

Heeraben Modi passed away : हीराबेन मोदींच्या निधनानंतर मोदींच भावुक ट्विट, शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम…

Pele dies : फुटबॉलचे जादूगार पेले यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss