अवतार २ ( Avatar:The Way of Water) चित्रपटाने केली २०० कोटीची कमाई

अवतार २  ( Avatar:The Way of Water) चित्रपटाने केली २०० कोटीची कमाई

अवतार २ हा १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता . अवतार २ प्रदर्शित होण्या पूर्वीपासून चाहते चित्रपट बघण्यासाठी उत्सुकत होती . चित्रपट रिलीझ होण्यापूर्वी १० दिवस आधीच चाहत्यांनी तिकीट खरेदी केली ,अवतार २ची तब्बल ४ हजार कोटींची ऍडवान्स बुकिंग झाली होती . हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन याने ‘अवतार द वे ऑफ वॉटर( Avatar: The Way of Water) हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट सद्य चर्चेत आहे. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच आठवड्यात अवतार ने लोकांच्या मनावर राज्य केले. ( Avatar: The Way of Water) सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींची ओपनींग केली होती.

चित्रपटाने बॉक्स ऑफिस (box office ) वर जादू केली आहेच पण प्रेक्षकांना हि वेड लावलेला आहे . सोशिअल मीडिया वर व इतर प्रसार माध्यमांवर सिनेमाची चर्चा चालली आहे . हा चित्रपट तरुण वयोगटाला जास्त पसंतीस आला आहे होता . चित्रपटाची निर्मिती २००० कोटी मध्ये झाली आहे .’अवतार 2′ हा सिनेमा भारतात हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

आतापर्यंत Avatar The Way of Water या चित्रपटाने २०५. ८५ कोटींची कमाई केली. ‘अवतार द वे ऑफ वॉटर'( Avatar: The Way of Water) हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.जगभरात अवतार ने $600 दशलक्ष पार केले Avatar: The Way of Water चित्रपटाचा सिक्वेल पूर्ण करण्यासाठी जेम्स कॅमेरॉनने एक दशकाचा कालावधी घेतला, ज्याला बहुतेक सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. अंदाजे $400 दशलक्ष बजेट असलेला, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे आणि चित्रपट निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर $2 अब्ज कमावण्याची गरज आहे. पुढे अवतार ३ येण्याची शक्यता वर्तवली जातेय .

हे ही वाचा : 

Sanjay Raut राज्य सरकारने एसआयटीचं रेशन केलंय, संजय राऊतांचे शिंदेंवर टीकास्र

Christmas party हे स्नॅक्स ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही बनवू शकता, जाणून घ्या पद्धत

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version