Avatar 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाजवले अधिराज्य

Avatar 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाजवले अधिराज्य

अवतार (Avatar) चित्रपटाचा भाग दोन हा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉन (James Cameron) दिग्दर्शित अवतार २ (Avatar) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जेम्स कॅमेरॉन हे तब्बल १३ वर्षांनंतर अवतारच्या दुसऱ्या भागाला घेऊन परतले आहेत. प्रेक्षकांकडूनही त्यांच्या या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सध्या या चित्रपटामुळे भारतातील अनेक आगामी चित्रपटांना त्यांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा आगामी चित्रपट सर्कसला (Cirkus) अवतार २ मुळे चांगलाच शह बसण्याची शक्यता आहे. कारण आवाराच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनासाठी राज्यातील सर्वच मुख्य सिनेमागृहांवर चित्रपटाने ताबा मिळवला आहे.

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शरीत अवतार द वे ऑफ वॉटर (Avatar The Way of Water) चा पहिला भाग २००९ साली प्रदर्शित करण्यात आला होता त्यावेळेसही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केल होत. तर आता ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा दुसरा भाग ही दीर्घकाळ चालणार असल्याचं दिसत आहे. कारण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून १४० कोटीची कमाई केली आहे. तर अवतार हा RRR, आणि Kantara नंतरचा भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार असल्याचे सांगितलं जात आहे. तर आता काही चाहत्यांनी अवतार २ हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांची मते मांडली आहेत. एका चाहत्याने संगितले आहे की खरंतर या चित्रपटाची सुरुवात थोडी लांबवली आहे. पण जेव्हा चित्रपटातील एक्स्ट्रासोलर जगताचा भाग सुरु होतो. त्यानंतर प्रेक्षकांचा कंटाळवाणेपणा कमी होतो.

लोक नावींना ‘शत्रू आणि बंडखोर’ म्हणत असतात , पण माणसच नावींच्या जमिनीवर जबरदस्तीने घुसखोरी करून कब्जा करतात. जादुई, काल्पनिक सेटिंग असूनही, अवतार सामाजिक गोष्टींपासून मुक्त नाही. अवतार वंश हे, सभ्यता यांना संबोधित करते. मजबूत लष्करी विरोधी भूमिका घेते आणि पालक आणि मुलांच्या साध्या कथेद्वारे पर्यावरण संवर्धनाची विनंती करते.नावी हे जंगलात राहणारे जीव आहेत. आणि माणसांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. हा चित्रपट नावी पालक त्यांच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी माणसांशी लढत आहेत, त्यामुळे हा चित्रपट नावी वंश आणि माणसांभोवती फिरतो.

चित्रपटातील कर्नल माइल्स क्वारिच हे पात्र , ज्याने जंगलातील लोकांच्या हातून आपल्या मानवी स्वरूपाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नवीन अवतार धारण केला आहे आणि नंतरच्या काळात आक्रमण करणार्‍या मानवांवर हल्ला करत त्यांच्या जीवन पद्धती नष्ट करताना दाखवले आहे.अवतार द वे ऑफ वॉटर चित्रपटातील पात्रांचे रेखाचित्र हे या चित्रपटाच्या मागील भागाप्रमाणेच चांगले नसले तरीही त्याचे कहाणी आणि सादरीकरण तितकेच चांगले असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : 

हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधावर सुबोध भावेंनी मांडली भुमिका, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही

मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो, सरकार पडणार असं म्हणतं राऊतांनी केला हल्लाबोल

‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version