spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Avatar चित्रपट ‘दृश्यम 2’ची डिमांड करणार कमी?, केवळ ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये २० कोटींचा पल्ला पार

हॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक खूळ लावणारा चित्रपट म्हणजे ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way of Water) गेल्या चार आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. पण याचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत अजय देवगणच्या (Ajay Devgn) चित्रपटाचे कलेक्शन चौथ्या आठवड्यातही चांगले होत असताना आता त्याच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवर (box office) ‘अवतार 2’ थेट ‘दृश्यम 2’शी टक्कर देणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत या दोन चित्रपटांच्या झंझावातामध्ये ‘सलाम वेंकी’ आणि साऊथचा ‘विजयानंद’ या चित्रपटाची अवस्था वाईट होणार आहे.

हेही वाचा : 

Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने गुरुवारी रात्रीपर्यंत संपूर्ण भारतभर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २० कोटींची कमाई केली. हा आकडा भारतातील या वर्षीच्या पहिल्या पाच आगाऊ बुकिंग पैकी एक आहे परंतु KGF चॅप्टर 2 ( ८०कोटी) ने सेट केलेल्या मार्कापेक्षा खूप मागे आहे, ज्याने भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक आगाऊ बुकिंग नोंदवली आहे. अवतार 2 ने सर्वोच्च आगाऊ बुकिंगच्या यादीत खाली असलेल्या काही चित्रपटांपेक्षा कमी तिकिटे विकली असली तरी, त्याने अधिक उच्च सरासरी तिकीट किमती गोळा केल्या आहेत. हे चित्रपट 3D आणि IMAX स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात रिलीज झाल्यामुळे आहे. काही शहरांमध्ये, काही IMAX शोसाठी तिकीटाच्या किमती ₹२५००-३००० इतक्या उच्च आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक शो रविवारपर्यंत विकले गेले आहे.

Vijay Diwas 2022 १९७१ साली भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला,१४ दिवसाच्या युद्धानंतर पाकिस्तान आलं शरण

जेम्स कॅमेरूनचा (James Cameron) ‘अवतार 2′(Avatar 2) हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग २३७ मिलिअन डॉलरमध्ये बनवण्यात आला होता. तर २००९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात २० हजार २६८ कोटींची कमाई केली होती. आता ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची निर्मिकी २५० मिलिअन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. रिलीजआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा जगभरात किती कोटींची कमाई करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Dry skin हिवाळयात कोरड्या त्वचेपासून त्रस्त आहत? मग चेहऱ्यासाठी ‘या’ फळाचा वापर करा

Latest Posts

Don't Miss