spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांचं “गाणं ‘वाजणार गं गाजणार गं’, ४ ऑक्टोबरला येतोय ‘एक डाव भूताचा’

गायक अवधूत गुप्ते, आनंदी जोशी (Singers Avadhoot Gupte, Anandi Joshi० यांच्या आवाजतलं "वाजणार गं गाजणार गं...." (Vajnaar Ga Gajnaar Ga Song) हे गाणं "एक डाव भूताचा" (Ek Daav Bhootacha) या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे.

गायक अवधूत गुप्ते, आनंदी जोशी (Singers Avadhoot Gupte, Anandi Joshi० यांच्या आवाजतलं “वाजणार गं गाजणार गं….” (Vajnaar Ga Gajnaar Ga Song) हे गाणं “एक डाव भूताचा” (Ek Daav Bhootacha) या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातलं हे गाणं सोशल मीडियाद्वारे (Socail Media) लाँच करण्यात आलं. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख (Siddharth Jadhav – Mayuri Deshmukh) यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.

रेवा इलेक्ट्रॉनिक्स (Reva Electronics) या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे (Siddharth Jadhav, Makarand Anaspure) यांच्या अभिनयाची जुगलबंदी एक डाव भूताचा या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांनी या पूर्वी अनेक हिट गाणी दिली आहेत. आता उत्तम शब्द, संगीत असलेल्या “वाजणार गं गाजणार गं…” या गाण्याची त्यात भर पडणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता ४ ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे ही वाचा:

‘इमर्जन्सी’वरून गदारोळ!, मात्र कंगनावर नाही कोणताही परिणाम, ‘भारत भाग्य विधाता’ या नव्या चित्रपटाची बोल्ड शैलीत घोषणा

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss