spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

इंडियन आयडॉल १३ चा मानकरी ठरला अयोध्येचा ऋषी सिंग

 संगीत जगतातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून नावाजलेला आहे तो म्हणजे इंडियन आयडॉल(indian idol). इंडियन आयडॉल हा सोनी tv वरचा गाण्याचा शो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसतो. इंडियन आयडॉल या पर्वाचे १३वे पर्वा नुकतेच पार पडले. या पर्वा मध्ये लाखों पेक्षा अधिक स्पर्धकांनी त्यांचे luck आजमावले होते.

संगीत जगतातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून नावाजलेला आहे तो म्हणजे इंडियन आयडॉल(indian idol). इंडियन आयडॉल हा सोनी tv वरचा गाण्याचा शो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसतो. इंडियन आयडॉल या पर्वाचे १३वे पर्वा नुकतेच पार पडले. या पर्वा मध्ये लाखों पेक्षा अधिक स्पर्धकांनी त्यांचे luck आजमावले होते. या शोची अवधी पसंती आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण वर्ग हा ऑडीशन (audition) साठी येतो. सोनी टीव्ही वरील इंडियन आयडॉल कॅच काळ finale होता. सर्वांच्या मनात हुरहूर लागून राहिली होती की, कोण विजयी स्पर्धक ठरेल आणि तो क्षण आलाच. या कार्यक्रमाचे १३ वे पर्व नुकतेच पार पडले आणि ‘इंडियन आयडॉल १३’चा विजेता ठरला आहे ‘ऋषी सिंह’. ‘ऋषी सिंह’ हा मूळचा अयोध्येचा. या पर्वात आपल्या आवाजाने केवळ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं नाही तर त्यांची मनंही जिंकली. ऋषी सिंह व्यतिरिक्त,या कार्यक्रमात ५ स्पर्धक अंतिम फेरी पर्यंत पोहोचले होते.त्यापैकी सोनाक्षी कर, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे स्पर्धक देखील फिनालेमधील दाखल झाले होते. पण अत्यंत चुरशीच्या या सामन्यातून ऋषिने सर्वांना मागे टाकत आणि आपले वेगळेपण सिद्ध करत 2 एप्रिल रोजी झालेल्या इंडियन आयडल ग्रँड फिनाले मध्ये विजेतेपद पटकावले.

ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच गाणी गाण्याची व लिहिण्याची आवड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ऋषी सिंह त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं, आणि महत्वाचे म्हणजे त्यांनी याचा खुलासा जेव्हा तो ऑडिशन ला येऊन त्याने गोल्डन ट्रॉफी जिंकली आणि घाई गेला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी ही गोष्ट त्याला सांगितले से खुद्द ऋषीनेच या शोमध्ये सर्वांसमोर केला होता. तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहेत.

सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल १३ हा शो यंदाच्या पर्वात नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया हा शो जज करत होते. तर या शो चे सीऊत्रसंचालन आदित्य नारायण करत होता. या दिमाखदार सोहळ्यात ऋषिला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सर्वांनी त्यांचं आणि त्याच्या आवाजाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर सोशल मिडीयावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऋषी सिंहला ‘इंडियन आयडॉल १३’ च्या ट्रॉफीसह २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार भेट म्हणून मिळाली आहे. याशिवाय त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे. विजेतेपद मिळाल्यावर ऋषी म्हणाला, ”माझं स्वप्न आज पूर्ण झालं. जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.’ आज मी माझ्या आई वडिलांचे नाव आशीर्वाद माझ्यापाठीशी होते म्हणून हे शक्य झाले.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांचे नवे ट्विट,PM Narendta Modi यांच्या मुख्य द्वारावर डिग्रीची फ्रेम लटकवा

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी…

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha, सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss