मुंबईतील हवेत व वातावरणात दुर्गंधी – जुही चावला

मुंबईतील हवेत व वातावरणात दुर्गंधी – जुही चावला

जुही चावला यांनी त्यांच्या ट्विटरच्या खात्यावरून ट्विट करत मुंबईतील हवेत व वातावरणात कमालीचा बदल झाल्याचे सांगितले आहे. जुही चावला यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर नुसतं जुही चावलाच नाही तर मुंबई व नवीमुंबईतील बऱ्याच नागरिकांना डम्पिंग ग्राउंड मुळे उत्पन्न होणाऱ्या या समस्येला सामोरे जावे लागत आहे .नवीमुंबईत ही काही ठिकाणी रात्रीच्या वेळी रसायनाच्या दुर्गंधीचा त्रास लोकांना होत आहे, पण मुंबईकरांना होणार त्रास आता त्यांच्या सहनशीलते पलीकडे गेला असल्याचे दिसून येत आहे .

जुही चावला यांनी ट्विटर मध्ये लिहिले आहे कि मुंबईत हवेत दुर्गंधी आहे, पूर्वी पूर्वी खाड्यांच्या (वरळी आणि वांद्रे जवळील जवळजवळ अस्वच्छ प्रदूषित जलकुंभ, मिठी नदीच्या जवळून गाडी चालवताना या दुर्गंधीचा वास येत होता,आता हा हि दुर्गंधी आणि विचित्र रासायनिक प्रदूषित हवा संपूर्ण दक्षिण मुंबईत येत आहे .

मुंबईत संपूर्ण देशभरातून लोक नोकरीच्या शोधात मुबंईत येत असतात त्यामुळे वस्त्याही वाढतात . वस्त्या वाढतात पण राहण्यासाठी जागा कमी होते मुंबईत जागा भरपूर महाग असल्या कारणाने बरेच स्थलांतरित झालेले लोक झोपड्यांमध्ये राहतात. मुंबईतील या वाढत्या लोकसंख्येबरोबरच या सर्व लोकांनी वापरून टाकून दिलेल्या गोष्टी म्हणजेच कचरा देखील वाढत आहेत .मुंबईतील रासायनिक व औषधाच्या कंपन्या त्यांना नको असलेली रसायन नद्यांमध्ये सोडतात लोक कचरा टाकतात ह्याच कारणामुळे मुंबईतील मिठी नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे.

मुंबईत राहणाऱ्या सर्व मुंबईकरांनी टाकून दिलेला कचरा हा मुंबई शहराच्या देवनार , मुलुंड डम्पिंग ग्राउंड,कांजूर लँडफिल साइट या तीन डम्पिंग ग्राउंड मध्य विस्थापित केला जातो . पण या तिन्ही डम्पिंग ग्राउंडच व्यवस्थापनातं बदल करावा लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे . कारण मुंबईकरांनी टाकून दिलेला कचरा त्यांनाच त्रासदायक ठरतो आहे . कचऱ्यामुळे तण आणि कीटकही पसरतात, त्यामुळे आजू बाजूची हवा आणि संपूर्ण पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. हा परिणाम आता दक्षिण मुंबईमध्ये दिसु लागला आहे .

हे ही वाचा :

ट्विटर होतोय #BoycottCadbury ट्रेंड ; काय आहे यामागील कारण

BTS चे सदस्य जीनचे ‘या’ गाण्याचे प्रकाशन रखडले

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिले अभिनेता विजय वर्माला निमंत्रण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version