भारतातील प्रसिद्ध गायक व रॅपरआदित्य प्रतीकसिंह सिसोदिया (Aditya Prateek Singh Sisodia) ज्याला बादशाह (BADSHAH) या त्याच्या टोपण नावाने ओळखले जाते त्याच्या विरोधात अश्लील गाणे गेल्याचे आरोप करत, तक्रार नोंदवण्यात आली होती. पण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना बादशहाने एकदाही न्यायालयात हजेरी लावली नव्हती. तर आता बादशहाला त्याची बाजू न्यायालयात मांडण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. नाहीतर त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
खरंतर या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध रॅपर्सची नवे आहेत. एक म्हणजे हनी सिंग (Honey Singh) आणि दुसरा म्हणजे बादशाह (BADSHAH). या प्रकरणी दोघांच्या आवाजाचे नमुने पोलिसांना घ्यायचे आहेत. हनी सिंग (Honey Singh) यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत मात्र, बादशाहचे (BADSHAH) नमुने मिळाले नाहीत. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यावेत यासाठी तक्रारकर्ते आनंदपाल सिंग गुरुपालसिंह जब्बाल यांनी त्यांचे वकील रसपाल रेणू यांच्यामार्फत अर्ज केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना गायक बादशाह (BADSHAH) याच्या वकिलांनी तक्रारीची प्रत मागितली होती. पण बादशहा यांनी आतपर्यंत अनेक वकील बदलले आहेत त्यामुळे बादशाह (BADSHAH) याला तक्रारीची प्रत देण्यात आली होती. हा वेळकाढूपणा असल्याचे तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादात सांगितले होते. यानंतर न्यायालयाने बादशाहचा (BADSHAH) अर्ज फेटाळला. तसेच आवाजाच्या नमुन्याबाबत तक्रार कर्त्याने सादर केलेल्या अर्जावर उत्तर देण्याची अंतिम संधी दिली. बादशाहाला सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जर बादशाह (BADSHAH) हजर न झाल्यास ७ फेब्रुवारी रोजी नागपूर न्यायालयास हजार नाही झाला. तर त्याच्या विरुद्धच्या अर्जावर त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले गेले आहे.
हे ही वाचा:
Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आमंत्रण पत्रिकेवर वापरा हे संदेश
फडणवीसांच्या आरोपावर दिलीप वळसे पाटलांचं प्रतिउत्तर