पुढील सप्टेंबर महिन्यात ८ दिवस बँका असणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

पुढील सप्टेंबर महिन्यात ८ दिवस बँका असणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये बँका एकूण ८ दिवस बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. रिझर्व्ह बँके नुसार, अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात आणि त्या राज्य ते राज्य आणि बँक ते बँकेत भिन्न असू शकतात. या महिन्याप्रमाणेच आठही सुट्ट्या प्रादेशिक सुट्या आहेत. तसेच, ज्या दिवशी या वित्तीय संस्था कार्यरत नसतील, त्या दिवशी ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध राहतील.

सुट्ट्यांचे गणित कसं असेल ?

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम तात्काळ पैसे पाठविणे आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

हेही वाचा : 

महागाईचा भडका ! १ लीटर दुधासाठी मोजावे लागणार ८० रुपये

८ दिवस बँका राहणार बंद 

सप्टेंबर महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी तु्म्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी जरुर बघायला हवी. नाही तर तुमचा वेळ वाया जाईल. सप्टेंबर २०२२ मध्ये बँकांना एकूण ८ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात देशाच्या विविध भागात विविध सण साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्री या सारख्या सणांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. पुढील महिन्यात ८ दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

पुढील महिन्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी : 

1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी
6 सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद
7 सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
8 सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
9 सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती
21 सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
26 सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद

नोएडातील टॉवर पडल्यानंतर मुंबईतील अनधिकृत इमारतींच काय ?, किरीट सोमय्यांचा सवाल

Exit mobile version