सलमानच्या आधी या सुपरस्टारची निवड झाली होती ‘मैने प्यार किया’ चित्रपट

बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जीने हिंदी सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये सुद्धा काम केले आहे आणि तो लवकरच अमेझॉन प्राइम पीरियड ड्रामा ‘ज्युबिली’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो श्रीकांत रॉयची भूमिका साकारणार आहे.

सलमानच्या आधी या सुपरस्टारची निवड झाली होती ‘मैने प्यार किया’ चित्रपट

बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जीने (Prosenjit Chatterjee) हिंदी सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये सुद्धा काम केले आहे आणि तो लवकरच अमेझॉन प्राइम पीरियड ड्रामा ‘ज्युबिली’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो श्रीकांत रॉयची भूमिका साकारणार आहे. सध्या यामधील सर्व कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. एका मुलाखतीमध्ये प्रोसेनजीतने खुलासा केला की सूरज बडजात्याच्या ‘मैने प्यार किया’ मधील सलमान खानच्या (Salman Khan) मुख्य भूमिकेसाठी आधी त्याची निवड करण्यात आली होती. त्याला तो चित्रपट न करण्यामागचं कारण विचारल्या असता त्याने त्याबद्दल जास्त माहिती देण्यास नकार दिला. “ते सोडा. विसरून जा. चला ‘ज्युबिली’बद्दल बोलूया,” असं प्रोसेनजीत म्हणाला.

पुढे प्रोसेनजीत म्हणाला , “पाहा, प्रामाणिकपणे सांगायचे तर माझा शेवटचा हिंदी चित्रपट ‘शांघाय’ होता आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या १० ते १२ वर्षांपासून मी मुख्य प्रवाहातील सिनेमा करत नाही.मी शिफ्ट झालो आहे आणि मी सर्व नवीन दिग्दर्शकांसोबत काम केले आहे असे तो म्हणाला. प्रोसेनजीतने आता बोलण्यास नकार दिला असला तरी ‘मैने प्यार किया’ नाकारण्यामागचे खरे कारण काही दिवसांपूर्वीच त्याने सांगितले होते. मला सलमानच्या आधी त्या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती.

हा सुपरहिट चित्रपट नाकारण्याचं कारण सांगत प्रोसेनजीत म्हणाला, “विजयता पंडितसोबतचा अमर संगी हा बंगाली चित्रपट खूप झाला होता. तेव्हा माझ्या तारखा शूटिंग साठी बुक होत्या. मला ‘मैने प्यार किया’ चित्रपट करायला आवडला असता, पण मला ती ऑफर तारखा नसल्याने नाकारावी लागली होती. मी तेव्हा बंगाली चित्रपट करत होतो. ते त्या वेळेचे मोठे निर्माते होते. ते एके दिवशी माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले ‘बेटा, माझ्याकडे एका हिंदी चित्रपट आहे, तू तो कर. तू मुंबईचा हिरो आहेस’ आणि त्यांनी मला आंधिया या हिंदी चित्रपटाची ऑफर दिली होती,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version