विक्रम वेधा रिलीज होण्यापूर्वी सैफने मांडले आपले विचार म्हणाला ‘ मी जरा डाव्या विचारसरणीचा…

आपली विचारसरणी ही उदारमतवादी असून डाव्या विचारांकडे झुकणारी असल्याचं तो म्हणाला.

विक्रम वेधा रिलीज होण्यापूर्वी सैफने मांडले आपले विचार म्हणाला ‘ मी जरा डाव्या विचारसरणीचा…

विक्रम वेधा हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होण्याआधी या न त्या कारणांमुळे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan in Vikram Vedha) चर्चेत येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सैफनं या सिनेमातील त्याच्या पात्राची विचारसरणी आणि प्रत्यक्षातील त्याची विचारसरणी यात तफावत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. या सिनेमात सैफनं एनकाऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी विक्रम ही भूमिका साकारली आहे. तर हृतिक रोशन यानं गँगस्टर वेधा ही भूमिका केली आहे. सैफच्या मते या सिनेमात दाखवलेली एनकाऊंटरमुळे कुणीही विचलीत होऊ शकते. त्यात जे दाखवलं आहे त्याच्याशी तो सहमत नाही. आपली विचारसरणी ही उदारमतवादी असून डाव्या विचारांकडे झुकणारी असल्याचं तो म्हणाला.

विक्रम वेधा सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल सैफनं सांगितलं की, ‘जेव्हा गँगस्टरांचा प्रश्न हाताबाहेर जातो तेव्हा एक व्यक्ती पुढं येते. यामध्ये हे दाखवले जाणार नाही की कथित गुन्हेगार वाचण्याच्या प्रयत्नात मारला गेला अथवा त्याची हत्या झाली. परंतु कायदेशीर प्रक्रियेवेळी असं दाखवलं गेलं की तो पळून जात होता त्यामुळे त्याला आम्हाला मारावं लागले. यालाच एन्काउंटर म्हणतात. हे खोटे एन्काउंटर असते. हे बेकायदा आणि कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे सिनेमात हे दाखवणं खूप त्रासदायक होतं, जसं की माझ्या पात्रामध्ये दाखवण्यात आलं आहे. पण त्याला वाटत असतं ती तो चांगला माणूस आहे कारण याची आवश्यकता आहे.’

यानं पुढं सांगितलं की, विक्रम वेधा हा अॅक्शन सिनेमा आहे. त्यात काही गोष्टींवर सखोलपणं भाष्य केलं आहे. को पुढे म्हणाला की, ‘माझी विचारसरणी थोडीशी डाव्यांकडे झुकणारी आहे. कदाचित मला ते नेमके ठावूक नाही. खरं तर सध्याच्या काळात ही गोष्ट सांगायला नको परंतु मी उदारमतवादी विचारांचा व्यक्ती आहे. मला असं वाटतं की कोणताही निर्णय घेण्याआधी प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. सिनेमात लोकांना मारणारा अशी माझी व्यक्तिरेखा दाखवली आहे, तसा प्रत्यक्षात मी नाही. त्या व्यक्तिरेखापेक्षा खऱ्या आयुष्यात मी वेगळा आहे.’

हे ही वाचा:

‘भगवा झेंडा हातात नसून हृदयात असावा’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

टीम इंडियाला मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून जसप्रीत बुमराह आऊट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version