तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी…; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केले ट्विट

तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी…; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केले ट्विट

टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गतवर्षी वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर १६०धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने ६ गडी गमावून ते पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने ५२चेंडूंमध्ये ८२ धावांची शानदार खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूंत ८२ धावांची नाबाद खेळी करत त्याला सर्वोत्कृष्ट मानली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने याला सहमती दिली आहे.

भारताने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर कोहलीचे अभिनंदन करण्यासाठी भारताच्या दिग्गज माजी फलंदाजाने ट्विट करत लिहीले की, “@imVkohli , निःसंशयपणे, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे ही एक आनंदाची गोष्ट आहे, रौफ विरुद्ध लाँग ऑनच्या १९व्या षटकात बॅकफूटवर मारलेला षटकार नेत्रदीपक होता! ते चालू ठेवा.”
मेलबर्नमध्ये सुमारे एक लाख लोकांसमोर विराट कोहलीच्या स्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ४ विकेट्सने हा सामना जिंकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या, खेळपट्टी पाहता ही धावसंख्या खूपच अवघड वाटत होती. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद, शान मसूद यांनी अर्धशतक केले.

एकवेळ भारताची अवस्था ४ बाद २६ अशी झाली होती, पण कोहली आणि पांड्याने काही षटके संयमाने खेळून काढली. १० व्या षटकांनंतर दोघांनी आक्रमण करत ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. भारताला शेवटच्या षटकांत १६ धावांची आवश्यकता असतानाच पहिल्याच चेंडूवर पांड्या बाद झाल्याने भारतावर दबाव आणखी वाढला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्रिझवर आलेल्या कार्तिकने एक धाव घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा घेतल्या. पहिल्या तीन चेंडूत तीनच धावा घेतल्याने भारतावर चांगलेच दडपण वाढले होते. मात्र, चौथ्या चेंडूवर विराटने डीप स्क्वेअरमधून सिक्स ठोकला आणि तो नो बाॅल सुद्धा ठरला. त्यामुळे भारताला सात धावा मिळाल्या. त्यामुळे तीन चेंडूत ६ असे समीकरण झाले. त्यानंतर पुढील वाईड बाॅल झाला. फ्रीट हिटच्या चेंडूवर तीन धावा घेतल्याने शेवटच्या दोन चेंडूत दोन धावा हव्या असतानाच पाचव्या चेंडूवर कार्तिक बाद झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर दोन धावा असताना आर. अश्विनने स्टम्पमागील चेंडू संयमाने सोडून दिल्याने पुन्हा एक वाईड झाला आणि सामना बरोबरीत झाला. अखेर शेवटच्या चेंडूवर अश्विनने एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयानंतर देशभरासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

हे ही वाचा :

Hardik Pandya Emotional : आमच्यासाठी आई बापाने घर सोडलं…; हर्दिक पांड्याचे पाणावले डोळे

IND vs PAK T20 World Cup: सामना जिंकल्यानंतर रोहितने विराट कोहलीला चक्क खांद्यावर उचललं आणि….; व्हिडिओ होतोय वायरल

बिग बी च्या पायाला टाके; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version