spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘ख्वाडा’, ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

गळाच जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘बबन’ ‘ख्वाडा’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारे आहेत. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते. आता भाऊराव नवा कोरा कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

चित्रपटाचे पोस्टर पाहता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पोस्टर मध्ये पाठमोरा उभा असलेला व्यक्ती नेमका कोण आहे, सीएनमाचा विषय नेमका कसा असेल. असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेत. विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या कथेला आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला भाऊराव प्रेक्षकांसमोर कसे मांडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा हा ‘टीडीएम’ हा आगामी कॉमेडी जॉनरचा सिनेमा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

सिनेमाविषयी बोलताना भाऊराव म्हणतात, ” एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीची धुरा मी या कॉमेडी जॉनरच्या ‘टीडीएम’ चित्रपटात पेलवली आहे. वेगळाच जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे. टीडीएम’ या सिनेमाव्यतिरकीत भाऊराव कऱ्हाडे यांचा हैद्राबाद कस्टडी’ हा त्यांचा सिनेमाही 2023 ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘टीडीएम’ या सिनेमाची कथा संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. भाऊरावांचा कॉमेडी जॉनर ‘टीडीएम’ असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन नक्की करेल यात काही शंका नाही.

Latest Posts

Don't Miss