Bhediya : हॉरर अन् कॉमेडीचा तडका! ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर आऊट

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Bollywood actor Varun Dhawan) आणि कृती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘भेडिया’ (Bhediya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhediya : हॉरर अन् कॉमेडीचा तडका! ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर आऊट

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Bollywood actor Varun Dhawan) आणि कृती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘भेडिया’ (Bhediya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील कृती सेननचा लुक हा समोर आला आहे. तसेच सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे आणि आज सिनेमाचा ट्रेलर हा आऊट झाला आहे.

हे ही वाचा: Bhediya Poster : ‘भेडिया’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कृती सेनॉनच्या लुकने प्रेक्षक थक्क!

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच ‘भेडिया’ (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. एकीकडे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे वरुण धवनचा अँँक्शन अवतारही पाहायला मिळत आहे. जिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात वरुण एका इच्छाधारी ‘भेडिया’ची भूमिका साकारत असल्याचे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. जंगलात एक लांडगा चावल्यानंतर वरुणला संसर्ग होतो आणि नंतर तो स्वतः देखील लांडगा बनून दहशत पसरवतो.

ट्रेलर पाहिल्यानंतर कळते की, वरुण धवनला जंगलातून जाताना एक लांडगा चावला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये अचानक बदल होऊ लागतात. वरुण धवन हळूहळू इच्छाधारी लांडगा बनू लागतो. ट्रेलरमध्ये ‘जंगल में कांड हो गया’ हे गाणे देखील आहे. आज वरुण धवनला बॉलिवूडमध्ये १० वर्षे पूर्ण होत आहेत. याच खास निमित्ताने या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन या चित्रपटात डॉक्टर कनिकाची भूमिका साकारत असून, संसर्ग झालेल्या वरुणला बरे करण्याचा प्रयत्न ती करत आहे. त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल या अभिनेत्यांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. २ मिनिटे ५५ सेकंदांच्या या ट्रेलरवरून हा चित्रपट केवळ हॉरर नसून, याला कॉमेडीचा तडका देखील असणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यानंतर, या चित्रपटातील वरुण धवन आणि क्रिती सेननचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये वरुण धवन ‘भेडिया’ अर्थात लांडग्याच्या खतरनाक अवतारात दिसला, तर ‘मिमी’ फेम अभिनेत्री क्रिती सेननच्या पूर्णपणे वेगळ्या लूकनेही चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Swapnil Joshi Birthday : स्वप्नीलने बालपणीच केलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण… घ्या जाणून

Drishyam 2 Trailer : ‘मी विजय साळगावकर खरं सांगतो की…’; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version