बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Bollywood actor Varun Dhawan) आणि कृती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘भेडिया’ (Bhediya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील कृती सेननचा लुक समोर आला आहे. तसेच सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले
‘भेडिया’ या विनोदी चित्रपटाचे पहिले एक्सक्लुझिव्ह पोस्टर अखेर आज रिलीज झाले आहे. भेडियातील मुख्य अभिनेता वरुण धवन अनेकदा चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करतो. सध्या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. पोस्टरमध्ये वरुण धवन मजबूत स्टाईलमध्ये दिसत आहे, तर क्रिती सेनॉन, दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी आणि पॉलिन कबाक देखील दिसत आहेत. ‘भेडिया’ सिनेमात कृती सेननचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. अमर कौशिकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. सध्या ‘भेडिया’ सिनेमातील कृतीचा लुक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
समोर आलेल्या पोस्टरमध्ये रात्रीच्या वेळी जंगलाचे दृश्य आहे, ज्यामध्ये वरुण धवन चंद्राच्या पार्श्वभूमीच्या विरूद्ध झग्यात दिसतो. त्याच्या डोळ्यांची चमक आणि ज्वाला पौराणिक लांडग्याची झलक दर्शवितात. स्त्री आणि बाला सारख्या यशस्वी चित्रपटांनंतर दिग्दर्शक अमर कौशिक हा तिसरा चित्रपट बनवत आहेत आणि भव्य दृश्यांसह शेअर केलेल्या पोस्टरने ट्रेलरबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमधील कृतीचा लुक हटके आहे. छोट्या केसांमध्ये ती खूपच वेगळी दिसत आहे. हातात इंजेक्शन पकडलेल्या कृतीने गोड हास्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमात कृती डॉ. अनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी कृतीने खूप मेहनत घेतली आहे. सिनेमासाठी तिला खास फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागलं आहे.
वरुण धवन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिनेश विजन निर्मित या चित्रपटात वरुण एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत क्रिती पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी दोघेही ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र दिसले होते.
View this post on Instagram
दिनेश विज्ञान ‘भेडिया’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात चांगल्या दर्जाच्या वीएफक्सचा वापर करण्यात आल्याने सिनेमातील हॉरर अधिक आकर्षक होणार आहे. ‘भेडिया’ सिनेमातील कृती सेननचा लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर कृतीला नेटकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. “छोट्या केसांमध्ये कृती खूपच गोड दिसत आहे, कृतीचा नवा अवतार पाहण्यासाठी उत्सुक आहोत”, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
या चित्रपटात कॉमेडीसोबत हॉररची सरमिसळ करण्यात आली असून, अनेक सीन्स धक्कादायक असतील . दिनेश विजानच्या मते हा चित्रपटही ‘रुही’ आणि ‘स्त्री’ प्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. निर्मात्यांच्या मते, चित्रपटातील अनेक सीन्स प्रेक्षकांना हसवतील. त्याच वेळी, असे काही आहेत जे भय निर्माण करतील. सध्या चाहते १९ ऑक्टोबरला ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत.
हे ही वाचा:
Swapnil Joshi Birthday : स्वप्नीलने बालपणीच केलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण… घ्या जाणून
Drishyam 2 Trailer : ‘मी विजय साळगावकर खरं सांगतो की…’; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज