Bhediya :वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ७.४८ कोटींची कमाई

Bhediya :वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी  केली ७.४८ कोटींची कमाई

हे वर्ष बॉलीवूड चित्रपटांसाठी काही चांगले ठरत नसले तरी, सध्याच्या काळात बॉलीवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यासारखे चित्र दिसत आहे. यामुळे फक्त दृश्यम २ वगळता बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अभिनेता अजय देवगणच्या दृश्यम २ ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पण अभिनेता वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाला प्रेक्षकांचा काही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ‘भेडिया’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर ७. ४८ कोटींची कमाई केली आहे.

अभिनेता वरूण धवन सध्या कार्तिक आर्यनप्रमाणे लोकप्रिय अभिनेता आहे. तसेच तो त्याच्या चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. अभिनेता वरूण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट हा काल सिनेमागृहात प्रदर्शित झाला. एका अहवालानुसार भेडिया चित्रपटाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी जगभरात १२.६ कोटी कमाई केली. काल संध्याकाळपर्यंत चित्रपटाने लक्षणीय वाढ केल्याचे य अहवालात म्हटले आहे. तर आज ट्विटरवर एका विश्लेषकांनी ट्विट केले की . ‘भेडिया चित्रपटाने’ जरी संध्याकाळ आणि रात्रीच्या शोमध्ये अधिक चांगल्या व्याप्तीची नोंद केली असली तरी चित्रपटाची कमाई चित्रपटांच्या दिवसाच्या कमाईच्या सरासरी पेक्षा कमी कमाई केली आहे, ज्यामुळे त्याला गती वाढवण्याची संधी मिळते. तर या चित्रपटाने कमाई ही ७. ४८ कोटींची कमाई केली आहे, असे या विश्लेषकाने सांगितले आहे. त्यामुळे या विश्लेषकांनी सांगितलेल्या वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाच्या एकदिवसीय कमाईची सरासरी ही अहवालाच्या सरासरीपेक्षा वेगळी आहे.

अभिनेता वरून धवन हा एक नवीन शैली वापरून पाहिली आहे आणि त्यात तो खूप खात्रीशीर दिसला आहे. माणसापासून लांडग्यात त्याचे रूपांतर होणारी दृश्ये थक्क करणारी आहेत. एक पौराणिक लांडगा चित्रपटातील भेडिया भास्करला चावतो लांडगा चावल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वेअरवॉल्फमध्ये बदलतो. या चित्रपटात क्रिती सेनन, दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका आहेत. हॉरर-कॉमेडीची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. तसेच वरूण धवन हा या चित्रपटात भेडिया भास्करची मुख्य भूमिका साकारत आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कन्येने लंडनमध्ये केले कुचीपुडी नृत्याचे सादरीकरण

Exit mobile version