spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Kumar च्या वाढदिवसानिमित्त ‘भूत बंगला’ चित्रपटाची घोषणा…

वाढदिवसाच्या दिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या नवीन 'भूत बंगला' (Bhoot Bangla) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी आता हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चा आज ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या नवीन ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी आता हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

अलीकडच्या काळात अक्षय कुमारचे चित्रपट प्रेक्षकांच्या फारसे पसंतीस पडले नाही. ऍक्शन असो किंवा कॉमेडी चित्रपट असो त्याच्या कुठल्याच प्रकारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी आणि कमाई करता आलेली नाही. आता आगामी चित्रपटासाठी त्याने हॉरर चित्रपटाला पसंती दिली आहे. अक्षय कुमारच्या येणाऱ्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि चित्रपटाचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. बऱ्याच वर्षाने या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि प्रियदर्शन (Priydarshan) एकत्र काम करणार आहेत. भूत बंगला चित्रपटात तो पुन्हा एकदा प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या चित्रपटांनी त्याला कॉमेडीचा बादशाह बनवलं होतं, त्यामुळे या चित्रपटामुळे त्याचं करियर पुन्हा यशाची उंची गाठेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

भूत बंगला चित्रपटाची पहिली झलक अक्षय कुमारच्या वाढदिवसादिनी चाहत्यांच्या भेटीला आणण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो हातात दुधाने भरलेली वाटी धरलेली दिसत असून दूध जीभेने चाटताना दिसत आहे. त्याच्या खांद्यावर एक काळी मांजर बसलेली दिसत आहे. बॉलिवूडच्या खिलाडीचा भूत बंगला चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची चर्चा सुरु आहे.

Latest Posts

Don't Miss