spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता अजय देवगणची मोठी घोषणा

चित्रपटसृष्टीतले कलाकार फक्त चित्रपटाच्या माध्यामातूनच पैसे कामावण्याचा काळ कधीच मागे लोटला. सध्याचे कित्येक कलाकार अभिनयाबरोबरच इतरही क्षेत्रातही प्रगती करताना दिसत आहेत.

चित्रपटसृष्टीतले कलाकार फक्त चित्रपटाच्या माध्यामातूनच पैसे कामावण्याचा काळ कधीच मागे लोटला. सध्याचे कित्येक कलाकार अभिनयाबरोबरच इतरही क्षेत्रातही प्रगती करताना दिसत आहेत. रितेश देशमुखची कृत्रिम मांसाहारी पदार्थ बनवण्याचा व्यवसाय आहे, हृतिक किंवा अनुष्का शर्मासारखे कलाकार स्वतःचा ब्रॅंड काढून वेगवेगळ्या गोष्टी त्यामाध्यमातून विकत आहेत. काही कलाकार हॉटेल व्यवसायातदेखील आहेत. हळूहळू आता हा प्रकार बॉलीवूडमधील कलाकारांपाठोपाठ मराठी मनोरंजनसृष्टीतही पाहायला मिळत आहे. आता बॉलीवूडचा लाडका सिंघम देखील व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. म्हणजेच त्यांनी याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

बॉलिवूडचा लाडका सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणने नुकतंच भागीदारीमध्ये गुजरातच्या अहमदाबाद शहरात एक मल्टीप्लेक्स थिएटर सुरू केलं आहे. याचं नाव आहे NY Cinemas. आपल्या मुलीच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरापासून अजयने या नव्या उद्योगाचा शुभारंभ केला आहे. अजयने ट्वीट करत नुकतीच याविषयी माहिती दिली आहे.

 तब्बल ३२० लोकांची क्षमता असलेलं हे थिएटर अत्याधुनिक साऊंड सिस्टिमने सज्ज आहे. शिवाय यातल्या चारही स्क्रीन्स या 3D चित्रपटासाठी योग्य आहेत. येणाऱ्या काळात फक्त अहमदाबादच नव्हे तंर सूरत आणि राजकोट या शहरातही अशाच प्रकारचं चित्रपटगृह निर्माण करण्याचा अजयचा विचार आहे. केवळ आणि केवळ चित्रपटाच्या प्रेमाखातर अजय देवगणने हा उपक्रम राबवला असल्याचं सांगितलं जात आहे.

अहमदाबादच्या अमरकुंज परिसरात हे नवीन थिएटर सुरू करण्यात आलं आहे. अजयने स्पष्ट केलं आहे की अशाप्रकरच्या चित्रपटगृहाची निर्मिती करण्यामागचा केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे लोकांचा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव आणखी भव्य करणे. या थिएटरमध्ये सर्वप्रकारच्या आधुनिक सुविधा असल्यामुळे प्रेक्षकांचा चित्रपट बघायचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या या वाढदिवसाला बेरोजगारी विरुद्धच्या आंदोलनाची सुरुवात

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss