Big Boss 4 : महेश मांजरेकर संतापले, बॅग घेऊन बाहेर काढिन! ‘या’ स्पर्धकाची काढली लायकी

Big Boss 4 : महेश मांजरेकर संतापले, बॅग घेऊन बाहेर काढिन! ‘या’ स्पर्धकाची काढली लायकी

‘बिग बॉस मराठी ४’ ची या आठवड्यातील चावडी या सिझनची सगळ्यात हटके चावडी ठरणार आहे. या आठवड्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांचा स्वतःच्या रागावरचा ताबा सुटणार आहे. घरातील स्पर्धकांनी केलेल्या कामासाठी आणि त्यांच्या वर्तणुकीसाठी ते स्पर्धकांना चांगलंच सुनावणार आहेत. स्पर्धकांनी खेळलेल्या चुकीच्या खेळाबद्दल ते सगळ्यांचा खरपूस समाचार घेताना दिसणार आहेत. मात्र ते सगळ्यात जास्त किरण माने यांना सुनावताना दिसणार आहेत.

हेही वाचा : 

क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई , ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती-ललित पुन्हा एकत्र

किरण यांनी या आठवड्यात खेळलेल्या खेळाबद्दल मांजरेकर त्यांचा कान पिळताना दिसणार आहेत. या आठवड्यात किरण यांनी इतर सदस्यांसोबत वाईट वर्तन केलं. सोबतच माझ्यासारखा खेळ कुणीही खेळत नाही अशा समजुतीत ते असल्याचं मांजरेकराचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर मांजरेकरांबद्दलही त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. मांजरेकर किरण यांना बोलताना म्हणतात, ‘मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाहीये. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला. ‘ असे मंगरेकरांनी किरण माने यांना म्हटले.

या आठवड्यात भाऊ- बहिणींच्या नात्याला आणखी घट्ट बनवण्याचा हा क्षण असतो. हा सण साजरा करण्यासाठी बिग बॉसचे घरही मागे हटलेले नाही. बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धक एव्हाना भांडणाच्या कचाट्यात दिसत असतात. बिग बॉसने दिलेला टास्क पुर्ण करण्यासाठी सर्वांच स्पर्धक तारेवरची कसरत करत तो टास्क पूर्ण करतात. त्यावेळी अनेक स्पर्धकांमध्ये चांगलाच भांडणाचा कलगीतुरा रंगताना दिसतो. पण दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात चैतन्यमय वातावरण खेळताना दिसत आहे.

Civil Code : गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल, मुख्यमंत्री पटेल यांचा निर्णय

Exit mobile version