Big Boss Marathi 4 : “चटर पटर चटर पटर… “, बिग बॉस मराठीच्या सीझन ४ चं टायटल साँग रिलीज

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो.

Big Boss Marathi 4 : “चटर पटर चटर पटर… “, बिग बॉस मराठीच्या सीझन ४ चं टायटल साँग रिलीज

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो. जेव्हापासून बिग बॉस सीजन ४ चा प्रोमो रिलीज झालाय तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात या सीजनाबद्दल आतुरता लागली आहे आणि आता अश्यातच “चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ” म्हणत, बिग बॉस मराठीच्या सीझन ४ चं टायटल साँग (Big boss Marathi 4 title song) रिलीज झालं आहे.

सर्व रिऍलिटी शो चा राजा असणारा एकमेव शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठी सीझन ४ (Big boss Marathi 4) ची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. हा सीझन येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हा शो होस्ट करणार आहेत. तसेच या नवीन सीजन चे टायटल साँग रिलीज झालं असून आधीच्या ३ सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके असल्याचे दिसून येत आहे. एकदम ‘यो स्टाईल’मध्ये या साँगचं चित्रीकरणही करण्यात आलेलं आहे.

“चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ” असं म्हणत महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घ्यायला तयार झालेले आहेत. प्रेक्षकही या टायटल साँगवर एकाहून एक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. सीझन 3 चा बेस्ट प्लेअर असलेल्या उत्कर्ष शिंदेनं कमेंट करत, ‘ये बात हंगामा सुरू’, असं म्हटलं आहे. तर एका यूजरने , ‘या राड्याची खूप वाट पाहिली’, असं म्हटलंय.

चौथ्या सीझनची घोषणा झाल्यापासून साऱ्यांनाच या नव्या सीझनची खूपच उत्सुकता आहे. या सीझनची थीमही वेगळी आहे. १०० दिवसांचा हा खेळ येत्या २ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकही बिग बॉसची आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे एकाहून एक सरस सेलिब्रिटी, अतरंगी कलाकार त्यांची होणारी भांडणं, रुसवे, फुगवे, प्रेम यामुळे हा शो खूपच इंन्ट्रेस्टिंग होतो. बिग बॉस घर हादेखील आकर्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यंदा BB हाऊसप्रमाणेच रिएलिटी शोचं टायटल साँगही तितकंच चर्चेत आहे.

हे ही वाचा:

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बिग बॉस मराठीचा ४था सीजन लवकरच सुरु होणार

बिग बॉस मराठी 4चं होस्टिंग करणार ‘हा’ सुपरस्टार अभिनेता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version