बिग बॉस मराठीचा चौथा सिझन लवकरच

बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीच्या इंस्टागर्म पेज वर याचा टिझरप्रदर्शित करण्यात आला.

बिग बॉस मराठीचा चौथा सिझन लवकरच

बिग बॉस

मुंबई : सगळ्या रिऍलिटी शो चा राजा असणारा एकमेव reality show म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीच्या इंस्टागर्म पेज वर याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. आतापर्यंत आलेलेबिगबॉस 3 सीझन प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरले. आता येणाऱ्या नव्या सिजनची उत्सुकता प्रेक्षकांध्ये अधिक आहे.

हेही वाचा :

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला पाहुणा आमिर खान, अमिताभ बच्चनही करणार या सेलिब्रिटींचे स्वागत

या सीजनमध्ये कोण कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली आहे. रंग मनाला भिडणारे अशा हॅशटॅग सकट हा टिझर प्रदर्शित करण्यातआला आहे. या आधी आलेले बिग बॉस मराठीचे 3 सिझनने टीआरपी चे सगळे रेकॉर्डस् मोडले होते. यंदाच्या सीझची वेळ आता जवळआली आहे. पुन्हा एकदा सदस्यांमधील खेळ, त्यांच्यातील वाद, नवनवे टास्क याने भरलेला हा सिझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल यात काही शंका नाही.

बिग बॉस मराठी चा या सीझनचे सूत्रसंचालन कोण करणार, कोणते नवे नवे खेळ असणार याबाबद सगळ्यांनाच उत्सुकता लागलीआहे. कलर्स च्या इंस्टाग्राम पेजवर हा टिझर येताच. या पोस्ट खाली कमेंट्सचा पाऊस पडला आहे. फायनली, नाईस सर्प्राइज अशा एक ना अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Exit mobile version