spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss Marathi Season 5: “सावधान…या घरावर आलंय एक मोठं संकट…तो आलाय…मानकाप्या…”

बिग बॉस मराठी या शोचा होस्ट रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर घरातील हा पाचवा आठवडा खास असणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा आठवडा घरातील सदस्यांना आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

बिग बॉस मराठी सीझन ५ (Big Boss Marathi Season 5) मधील सदस्यांचा मागील चार आठवड्यांपासून सुरु असलेला खेळ आता पाचव्या आठवड्यात आला आहे. या आठवड्यात घरातून इरिना रुडाकोवा बाहेर पडली. या घरातील पाचव्या आठवड्याची सुरुवात ही एका संकटाने होणार आहे. या संकटामुळे मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे. बिग बॉस मराठी या शोचा होस्ट रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर घरातील हा पाचवा आठवडा खास असणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा आठवडा घरातील सदस्यांना आव्हानात्मक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. हा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत की, “सावधान…या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय…मानकाप्या…” या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची चांगलीच झोप उडालेली असून ते घाबरलेले दिसत आहेत. तसेच घरातील एका आरशावर, “एकटं फिरू नका… नाहीतर…मानकाप्या”, असे लिहिले आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात मानकाप्याचे भूत कॅप्टन्सीचा टास्क असण्याची शक्यता आहे. येणाऱ्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये कोणता सदस्य यंदा बाजी मारणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. मागील आठवड्यात घरातील नात्यांची गणितं बदलताना दिसली. भाऊंच्या धक्क्यावर चक्रव्यूमुळे टीम ए मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निक्कीच्या पाठीमागे तिची होणारी निंदा नालस्ती आणि कट पाहून ती दुखावली आहे. तिने भाऊंच्या धक्क्यावर टीम ए मधील सदस्यांना इशारा दिला आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखने शनिवारी जान्हवी किल्लेकरला तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला घराच्या बाहेर तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. सध्या टीम ए मधील अभिजित सावंत आणि आर्या यांचे जमत नाही. मागील आठवड्यापासून आर्या एकटी पडली असल्याचे दिसून आले आहे.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात नवी समीकरणे जुळणार का, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सर्व सदस्य आपापला मार्ग कसा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नवीन टास्कमुळे इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वतःच घाबरले आहेत. त्यांची ही भीती किती दिवस असणार हे पाहणार आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

Janmashtami 2024 : वृंदावन ते गुजरातपर्यंत, देशातील भगवान कृष्णाची सर्वात भव्य आणि सुंदर मंदिरे कोठे आहेत घ्या जाणून…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss