Big Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीनची एन्ट्री…घरात शिरताच Rakhi Sawantचा धिंगाणा

निक्की तांबोळीने तर पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचे घर डोक्यावर घेतलं होतं, त्यामुळे ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)ला बिग बॉसच्या घरात एन्ट्री द्यावी अशी मागणी प्रेक्षकांकडून वारंवार होत होती. अखेर बिग बॉसने प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली.

Big Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीनची एन्ट्री…घरात शिरताच Rakhi Sawantचा धिंगाणा

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन (Big Boss Marathi Season 5) आता अंतिम टप्प्यावर आले आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. घरातील काही सदस्यांनी तर हा सीझन चांगलाच गाजवला. निक्की तांबोळीने तर पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचे घर डोक्यावर घेतलं होतं, त्यामुळे ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)ला बिग बॉसच्या घरात एन्ट्री द्यावी अशी मागणी प्रेक्षकांकडून वारंवार होत होती. अखेर बिग बॉसने प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली.

बिग बॉसच्या घरात नवीन भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात राखी सावंत येणार असल्याचं दिसत आहे. राखी सावंत बिग बॉसच्या घरात येताच म्हणते की, “हॅलो बिग बॉस आय एम बॅक तुमची पहिली बायको”. हे ऐकल्यावर निक्कीला धक्काच बसतो. त्यावर हाय रब्बा असं म्हणत निक्कीची रिऍक्शन येते. निक्कीच्या रिऍक्शनवर राखी म्हणते, “सस्ती राखी सावंत, आता घरात चालणार आहे फक्त माझाच ठणाठणा….निकी तांबोळी सोडून येणार तुला आंबोली”. असे म्हणून निक्कीला चिडवते.

बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्याने बिग बॉस प्रेमी भलतेच खुश झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी तर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “चला शेवट तरी गोड होतोय. शेवटी राखीला आणल्यावर राख तरी होणार नाही टीआरपीची”. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “राखी शिवाय बिग बॉस पूर्ण होऊच शकत नाही”. तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, “राखीला थोडं आधी पाठवायला पाहिजे होत घरात, अजून मज्जा आली असती”. आणखी एकाने म्हटलंय, “चला उशिरा का होईना निक्कीला टक्कर देण्यासाठी आली राखी”. राखीच्या एन्ट्रीने घरात आता काय काय पाहायला मिळणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version