Big Boss Marathi Season 5: पहिल्यांदाच होणार फॅन्सच्या उपस्थितीत जोरदार ग्रँड सेलिब्रेशन…

बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. त्यादरम्यानच बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनाले आधीच जंगी सेलिब्रेशन सुरु झाले आहे.

Big Boss Marathi Season 5: पहिल्यांदाच होणार फॅन्सच्या उपस्थितीत जोरदार ग्रँड सेलिब्रेशन…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन (Big Boss Marathi Season 5) चा आता शेवटचा आठवडा सुरु आहे. ६ ऑक्टोबरला बिग बॉसचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. त्यादरम्यानच बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनाले आधीच जंगी सेलिब्रेशन सुरु झाले आहे.

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या भागांमध्ये असे कधी घडले नव्हते ते आता घडणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थितीत जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करणार आहेत. तेव्हा बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवली जाईल. त्याक्षणी फॅन्सच्या उपस्थितीमुळे घरातील सदस्य जास्तच भावुक झाल्याचे पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निक्की तांबोळीला तिकीट टू ग्रँड फिनाले मिळालं आहे. याशिवाय आता बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाण, अभिजित सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर हे स्पर्धक विजेतेपदाच्या अंतिम शर्यतीत आहेत.

नुकताच बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे या सदस्याचा प्रवास संपला. पॅडी कांबळे घराबाहेर पडल्यामुळे घरातील सदस्यांसोबत चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. पॅडी कांबळे घराबाहेर पडल्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरवर्षी बिग बॉसचा शो हा १०० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेतो. यंदा पहिल्यांदाच हा शो ७० दिवसांनी संपवण्यात येणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Amit Shah २०२९ मध्ये दिल्लीत पण नसतील, सध्या ते कुबड्या घेऊन सत्तेत आहेत: Vijay Wadettiwar

Shivaji Park ठाकरेंचेच; Shinde गटाच्या Dasara Melava चं नवं ठिकाण ठरलं? | Shivsena, EKNATH SHINDE.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version