spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss Marathi Season 5: “गुलिगत सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”…सूरजच्या खेळीचं झालं कौतुक

सध्या 'गुलिगत धोका' सूरज चव्हाणची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर सूरजला ट्रोल करण्यात आले. या सीझनच्या पहिल्या काही दिवसात सूरजला एकटं पाडण्यात आले होते. मात्र, सूरजने आता घरातील सदस्यांचे आपल्याबद्दलचे मत बदलण्यास भाग पडले आहे.

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi Season 5) च्या यंदाच्या सीझनमध्ये सूरज चव्हाणने (Suraj Chavhan) एन्ट्री केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण सध्या ‘गुलिगत धोका’ सूरज चव्हाणची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर सूरजला ट्रोल करण्यात आले. या सीझनच्या पहिल्या काही दिवसात सूरजला एकटं पाडण्यात आले होते. मात्र, सूरजने आता घरातील सदस्यांचे आपल्याबद्दलचे मत बदलण्यास भाग पडले आहे. बिग बॉसच्या घरात गुलिगत सूरजला खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले. आता मात्र, बिग बॉसच्या घरात सुरुवातीला शांत असणारा सूरज टास्कच्या वेळी संतापलेला बघायला मिळाला. पण त्याने स्वतःवर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. विकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केले. तसेच त्याला इथून पुढेही गुलिगत पॅटर्ननेच खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.

बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाणचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर कोकण हार्टेड गर्ल आणि घराची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी चर्चा करताना दिसत आहेत. त्यामध्ये अंकिता म्हणते की, “सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं.” त्यावर पॅडी म्हणतो की, बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणाला, “दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता,” असे म्हणत पॅडी सूरजची निरागसता आणि त्याचे स्वच्छ मन यावर मनभरून प्रशंसा करतो. त्यावर अंकिता म्हणते की, “सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली.”

टिक टॉक या शॉर्ट व्हिडीओ ऍपमुळे सूरजला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा चाहता वर्ग बराच मोठा होता. इंस्टाग्रामवर त्याचे ९ लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे. बारामतीमधील या रील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी आणि आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे पाहणे आता प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. सोशल मीडियावर सूरजला चांगला पाठिंबा मिळत आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!, एकाच दिवशी सादर करणार ‘अस्तित्व’, ‘मोरूची मावशी’ आणि ‘पुन्हा सही रे सही’चे प्रयोग

क्रेनमध्ये बिघाड हे नेते पडतापडता वाचले; जाणूयात सविस्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss