Big Boss Marathi Season 5:कॅरॅमल कस्टर्ड खाताना वर्षा ताईने सांगितले सौंदर्याचं रहस्य

वर्षाताई यांच्या सौंदर्याचं रहस्य नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे. याचं उत्तर स्वतः वर्षाताईंनी सांगितलं आहे.

Big Boss Marathi Season 5:कॅरॅमल कस्टर्ड खाताना वर्षा ताईने सांगितले सौंदर्याचं रहस्य

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) च्या पाचव्या सीझन (Season 5)मध्ये पहिल्याच दिवसापासून वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या त्यांच्या बोलण्यामुळे सतत चर्चेत असतात. त्याप्रमाणे अनेकदा त्यांचा मेकअपही चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे वर्षाताई यांच्या सौंदर्याचं रहस्य नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे. याचं उत्तर स्वतः वर्षाताईंनी सांगितलं आहे. आजच्या Unseen Undekha मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येणार आहे. वर्षा ताई कॅप्टन झाल्यामुळे कॅरॅमल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

वर्षा ताई कॅरॅमल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणतात की, “आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरॅमल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरॅमल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरॅमल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टन्सीचं सेलिब्रेशन झालंय”. कॅरॅमल कस्टर्ड खात वर्षा ताई पुढे म्हणाल्या की, “आता तुम्हाला कळलंच असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे.”

नवीन दिसणाऱ्या Unseen Undekha मध्ये अंकिता, अभिजित आणि पॅडी दादा आक्रमक घनः श्यामवर चर्चा करताना दिसत आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत, “घनःश्यामचं कठीण आहे. त्यांच्या लोकांमध्येही सतत वाजत असतं”, यावर अंकिता म्हणते की, त्याला बोलण्याची शिस्त नाही, तो त्याच्या मतांवर ठाम नाही”. त्यावर अभिजित म्हणतो, “घनःश्याम अग्रेसिव्ह आहे. काही बोलायला गेलो की तो वाकड्यातच जातो. त्याला कॅमेरा पहिला पाहिजे असतो”. पुढे अंकिता म्हणते की, “हुशार आहे तो.” आता येणारा पुढील भाग नवीन काय ट्विस्ट घेऊन येणार आहे हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तारीख जाहीर, कुठे होणार सामना घ्या जाणून?

छत्रपती शिवरायांची कोणाचीही तुलना होणार नाही म्हणून ही राजकीय माफी । Sanjay Raut | Malvan | Rajkot

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version