Big Boss Marathi Season 5: योगिता चव्हाणच्या डोळ्यात आले पाणी ….कारण काय?

योगिता बिग बॉसच्या घरात अजून तरी कोणत्याही वादविवादात पडली नाहीये. सर्व काम ती शांतपणे करत आहे. पण नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये योगिताच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसत आहे.

Big Boss Marathi Season 5: योगिता चव्हाणच्या डोळ्यात आले पाणी ….कारण काय?

नुकताच बिग बॉस (Bigg Boss Marathi Season ५) मराठीच्या नव्या सीझनला जोरदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच १६ स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात झाली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी, रिऍलिटी शो गाजवणाऱ्या कलाकारांपासून ते रील स्टार्सही बिग बॉसच्या घरात आहेत. ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता  चव्हाण (Yogita Chavhan) बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झाली आहे. योगिताने अभिनेत्री जान्हवी किल्लेकरसोबत (Janhavi Killedar) बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दमदार एन्ट्री केली आहे.

योगिता बिग बॉसच्या घरात अजून तरी कोणत्याही वादविवादात पडली नाहीये. सर्व काम ती शांतपणे करत आहे. पण नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये योगिताच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसत आहे. घरातील इतर सदस्य तिची समजूत काढतानादेखील दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या काल झालेल्या भागामध्ये सर्व सदस्य गार्डन एरियात गप्पा मारत बसलेले असतात. पुढे योगिता बेडरूमच्या इथे येते. तिथे आल्यावर ती आर्या जाधव (Arya Jadhav) ला मिठी मारून रडताना दिसते. योगिताला तिचा पती सौरभ चव्हाण (Saurabh Chavhan) आणि घरच्यांच्या आठवणीने योगिताच्या डोळ्यात पाणी आले. “बिग बॉस घरात रडण्याचा पहिला मान मिळालेला आहे योगिता यांना”, असे अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) म्हणताना दिसते.

योगिताला शांत करण्यासाठी पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळेने (Pandharinath Kambale) कॅमेरासमोर योगिताच्या पतीला निरोप दिला की, “तुझी बायको खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही जनरल जे काय बोलतो त्याचा विचार करू नकोस. तुझी बायको खूप स्ट्रॉंग आहे काळजी करू नकोस.” योगिता चव्हाणचा पती सौरभ चव्हाणही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. योगिता आणि सौरभ या दोघांनी ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत एकत्र काम केले होते.

हे ही वाचा:

Uran Murder Case: आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी!

पोस्टर रिलीजद्वारे ‘रघुवीर’ चित्रपट २३ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version