अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे ‘बिग बॉस १७’चा विजेता,जाणुन घेऊयात मुनव्वर फारुकीचा प्रवास…

बिग बॉस १७ च्या ट्रॉफीचा मानकरी मुनव्वर फारुकी ठरला आहे. मुनव्वरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.

अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे ‘बिग बॉस १७’चा विजेता,जाणुन घेऊयात मुनव्वर फारुकीचा प्रवास…

टेलिव्हिजनवरील बिग बॉस १७ हा कार्यक्रम मागच्या वर्षी १५ ऑक्टोबरला सुरु झाला आहे.या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या अनेक महिन्यात  बिग बॉस १७ च्या घरात मोठा ड्रामा,राडा आणि भांडण आपल्याला पाहायला मिळाले.दरम्यान आता अखेरीस या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला आहे.. तर बिग बॉस १७ च्या ट्रॉफीचा मानकरी मुनव्वर फारुकी ठरला आहे. मुनव्वरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.

दरम्यान मुनव्वर फारुकीची रिअॅलिटी शो जिंकण्याची ही पहिली वेळ नव्हे, याआधी त्याने कंगना रणौतचा शो ‘लॉकअप’ही जिंकला आहे. त्यामध्ये जो पॅटर्न तो वापरत होता, त्याच पॅटर्नने तो बिग बॉस १७ मध्येही खेळताना दिसला.मात्र मुनव्वर बद्दल बोलायचं गेलं तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खुप उलाढली देखील झाल्या आहेत. तर मुनव्वर चा आतापर्यंतचा प्रवास देखील आपण जाणुन घेऊयात.

मुनव्वर फारुखीने २८ जानेवारीला आपला ३२ वा वाढदिवस साजरा केला, त्याचा जन्म गुजरातमधील जुनागढ याठिकाणी झाला. अनेकदा त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये या जागेचा उल्लेख पाहायला मिळतो. मीडिया रिपोर्टनुसार २००२ मध्ये एका दंगलीमध्ये त्याचे घर पडले होते, त्यानंतर त्याचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले. मुनव्वरने खूप लहानपणीच आई गमावली, त्यानंतर वडील आजारी पडल्यानंतर त्यानेच घराची जबाबदारी स्वीकारही होती. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्याने काम करण्यास सुरुवात केलेली.

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनव्वर त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.  लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक,  गाडी हे मिळाले. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.

याच दरम्यान मुनव्वर फारुकी आणि  वाद हे समीकरण फारच जवळचं आहे.कारण जिथे वाद तिथे मुनव्वर फारुकी यांचे अगदी जवळचे नाते आहे. मुनव्वर जातो त्याठिकाणी वाद निर्माण होतातच असतात. आधी ‘लॉकअप’ हा कंगनाचा शो असो किंवा आता सुरू असणारे बिग बॉस १७… मुनव्वरने कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना केलाच आहे. दरम्यान बिग बॉसच्या इतिसाहात असे पहिल्यांदाच घडले की शोमध्ये एखाद्याची एक्स गर्लफ्रेंड स्वतः शोमध्ये आली आणि स्पर्धकाच्या नात्याबद्दल खुलासा केला. होय, आयशा खान बिग बॉस १७ च्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली आणि तिने मुनव्वरवर थेट टू-टायमिंगचा आरोप केला होता.

आयशाने केलेला टू-टायमिंगचा आरोप म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार मुनव्वरचं एकाच वेळी दोन मुलींसोबत अफेअर होतं. दरम्यान मुनव्वर वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे. लग्न, घटस्फोट, मुलाची कस्टडी, कॉमेडियनने खाल्लेली तुरुगांची हवा, कंगना रणौतचा शो ‘लॉकअप’ यामुळे अनेकदा मुनव्वर चर्चेत आला आहे. बिग बॉस १७ मुळे त्याच्याशी संबंधित कॉन्ट्रोव्हर्सींची प्रेक्षक आणि स्पर्धकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. मुनव्वरने बिग बॉस १७ मध्ये सांगितले की, त्याने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. शिवाय त्याला त्याच्या मुलाचा ताबाही मिळाला आहे. दरम्यान ‘लॉकअप’नंतर तो नाझिला या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता असल्याची चर्चा झाली. ते अनेकदा एकत्र स्पॉटही झाले होते. शिवाय त्याने अनेकदा BB17 मध्ये नाझिलाचा उल्लेख केला होता, की तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र आयशा आल्यानंतर घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. आता त्याच्यासोबत आयशाही नाहीये आणि नाझिलादेखील नाही. नाझिलाने स्वतः सोशल मीडियावर जाहीर केले की मुनव्वरशी तिचा कोणताही संबंध नाही.

२०२२ साली मुनव्वर फारूकीने कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतलेला, त्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरु झाली. एक महिला आणि एका मुलासोबतचा मुनव्वरचा फोटो व्हायरल झाला होता. जेव्हा कंगनाने शोमध्ये त्याला फोटोमागचे सत्य काय आहे, याबद्दल विचारले तेव्हा मुनव्वरने सांगितलेले की हा फोटो त्याची पत्नी आणि मुलाचा आहे. त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचेही सांगितले. तोपर्यंत मुनव्वर विवाहित आहे किंवा त्याचा घटस्फोट झाला आहे किंवा त्याला मुलगा आहे, याविषयी त्या शोमधील स्पर्धक आणि असंख्य स्पर्धकांना माहीतही नव्हते.

आयशा जेव्हा बिग बॉस १७ च्या घरात होती, तेव्हा तिने असाही आरोप केलेला की मुनव्वरने आणखी तिसऱ्या मुलीलाही लग्नाची ऑफर दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार ही मुलगी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. यानंतर अंजली अरोराचे नाव चर्चेत आले. कारण लॉकअपमध्ये अंजली आणि मुनव्वर यांची खास मैत्री होती. अंजलीने तिचे मुनव्वरवर प्रेम असल्याचेही त्याला सांगितले होते. मात्र या शोनंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंजलीने एका मुलाखतीत उलगडा केला होता की तो अनेक मुलींसोबत आहे.

दरम्यान ‘लॉकअप’ किंवा ‘बिग बॉस १७’ हे वादग्रस्त शो करण्याआधीपासून मुनव्वर वादात सापडला आहे. स्टँडअप कॉमेडियन असणारा मुनव्वर याआधी जातीय विनोद केल्यामुळे वादात सापडला होता. त्याच्यावर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. शिवाय त्याने दिग्गज राजकीय मंडळींनाही आपल्या विनोदातून लक्ष्य केले होते. २०२१ मध्ये त्याला इंदौरमध्ये अटक करण्यात आलेली. साधारण महिन्यापेक्षा अधिक काळ त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती.दरम्यान बिग बॉस १७ च्या ट्रॉफीवर मुनव्वरने नाव कोरलं आहे. तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला आहे. ‘बिग बॉस 17’चा विजेता ठरलेल्या मुनव्वरला ट्रॉफीसह 50 लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे.अखेर वाद,घटस्फोट ,विजेतापद हे चढउतार पाहिल्यानंतर, वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी नॅशनल टीव्हीद्वारे चव्हाट्यावर आल्यानंतर मुनव्वरने अखेर ट्रॉफीवर नाव कोरले. 

 

हे ही वाचा:

आजपासून मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर, असा असणार जरांगेंचा दौरा

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version