कोरियन ॲक्टर Lee Jong Suk आणि IU करतायत एकमेकांना डेट, दोघांच्याही एजंसींनी दिली माहिती

या दोघांच्या नात्याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्या एजन्सींनी दिली असून त्यांनी चाहत्यांना आयु (IU) आणि ली जोंग सुक (Lee Jong Suk) यांच्या नात्याला पाठींबा देण्याची विनंती केली आहे.

कोरियन ॲक्टर Lee Jong Suk आणि IU करतायत एकमेकांना डेट, दोघांच्याही एजंसींनी दिली माहिती

लोकप्रिय कोरियन अभिनेत्री आणि गायिका आयु (IU) आणि कोरियन अभिनेता ली जोंग सुक (Lee Jong Suk) १० वर्षांपेक्षा अधिक काळ एकमेकांचे चांगले मित्र राहिल्यानंतर आता ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी सध्या समोर येत आहे. ही बातमी जरी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी असली तरी दुसऱ्या क्षणाला त्यांना सुखावणारी आहे. या दोघांच्या नात्याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्या एजन्सींनी दिली असून त्यांनी चाहत्यांना आयु (IU) आणि ली जोंग सुक (Lee Jong Suk) यांच्या नात्याला पाठींबा देण्याची विनंती केली आहे.

आयु आणि ली जोंग सुक (IU and Lee Jong Suk Dating) यांच्या नात्याची पुष्टी करत ली जोंग सुकच्या एजन्सीने अधिकृत विधान जाती केले आहे. ते त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हणाले, अभिनेता ली जोंग सुक आणि आयु (IU and Lee Jong Suk) यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्यानंतर आता एका नव्या नात्याला सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला (चाहत्यांना) अशी विनंती करतो की, कृपया या नात्याला आपण पाठिंबा दर्शवावा, जेणेकरून हे नातं असंच पुढे टिकेल, धन्यवाद.

तर आयु आणि ली जोंग सुकच्या या नात्याबद्दल बोलताना आयुची (IU) एजन्सी म्हणाली, आयु आणि ली जोंग सुक यांनी अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर आता नव्या नात्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या नात्याचे मोठ्या मनाने स्वागत करावे अशी विनंती आहे. तसेच नव्या जोडप्याचे अभिनंदन.

शुक्रवारी (३० डिसेंबर) रोजी ली जोंग सुकने MBC ड्रामा अवॉर्डस सोहळ्यात एका व्यक्तीचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर तो कुणालातरी डेट करत असल्याच्या अफवा अजून वेगाने पसरू लागल्या. तो म्हणाला, लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर मला सतत खूप भीती आणि काळजी वाटतं होती, तसेच खूप वेदनाही होत होत्या. पण, या काळात एक व्यक्ती माझ्या सतत सोबत होती, जिने मला साथ दिली, आधार दिला, सकारात्मक ऊर्जा दिली आणि नवी दिशा दाखवली. मी त्या व्यक्तीचा खूप आदर करतो आणि माझ्यासोबत सतत राहिल्यामुळे आभारही मानतो.

इतकाच नव्हे तर २०२२ च्या या ख्रिसमसच्यादिवशी देखील हे जोडपं सोबत होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. आयु आणि ली जोंग सुक या दोघांनीही यावर्षी जपानमध्ये ख्रिसमस साजरा केला आणि त्यानंतर अवॉर्ड सोहळ्याच्यावेळी ली जोंग सुकने उल्लेख केलेली व्यक्ती आयु तर नाही ना असा प्रश्न आता चाहत्यांना पडू लागलाय.

हे ही वाचा:

ठरलं तर मग! ‘या’ तारखेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवानी करणार लग्न

चित्रा वाघ उर्फी जावेदच्या ड्रेससिंगवर संतापल्या, पोलिसांकडे केली ‘हि’ मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version