“राखी सावंतला अटक (Rakhi Sawant arrested),” शर्लिन चोप्राने ट्विटरवर शेअर केले. अभिनेत्रीने तिच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटवर लिहिले की राखीला पोलिसांनी अटक(arrested) केली आहे. तिने एफआयआरबद्दल (FIR) अतिरिक्त माहिती देखील शेअर केली. आदिल दुर्राणीशी (Adil Durrani)लग्न झाल्यापासूनच चर्चेत असलेली राखी तिची डान्स अकादमी सुरू करणार असल्याची बातमी होती. तथापि, ताज्या घडामोडींनुसार, शर्लिनने यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे आंबोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
BREAKING NEWS!!!
AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022
YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, “आंबोली पोलिसांनी (Amboli Police) राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. काल राखी सावंतचा एबीए 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.” चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
आदिल खान दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने धर्मांतर केल्याचीही कबुली दिली होती. मॅरेज सर्टिफिकेटवर तिचं नाव ‘फातिमा’ असं लिहिण्यात आलं होतं. लग्नासाठी धर्मांतर केल्याचं राखीने स्पष्ट केलं. त्यानंतर ती पापाराझींसमोर हिजाबमध्येही दिसली. इतकंच नव्हे तर पती आदिलसोबत आधी उमराह करण्यासाठी जाणार असल्याचंही तिने म्हटलं आहे. “आम्ही निकाह केला आहे. आदिलने माझं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. माझं प्रेम मिळवता यावं म्हणून मला जे करता आलं ते मी केलं. माझ्या पतीला मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे,” असं देखील राखी म्हणाली.
हे ही वाचा:
विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट
जॅकलीन फर्नांडिसने केला आरोप, सुकेश चंद्रशेखर माझ्या भावनांशी खेळला