”बिग बॉस 16” पर्व होणार लवकरच सुरू

बिग बॉस 15 मध्ये अनेक कलाकारांनी मनोरंजन करून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं .तर आता बिग बॉस हिंदी सीझन 16 हे पर्व लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.या नविन पर्वासाठी आता कलाकारांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे.

”बिग बॉस 16” पर्व होणार लवकरच सुरू

बिग बॉस हिंदी हा रियालिटी शो चे अनेकजण चाहते आहेत.तर आता बिग बॉस बिग शो कधी सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.बिग बॉस 15 मध्ये अनेक कलाकारांनी मनोरंजन करून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं .तर आता बिग बॉस हिंदी सीझन 16 हे पर्व लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.या नविन पर्वासाठी आता कलाकारांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे.आणि या शो साठी बलात्कार प्रकणामुळे शिक्षा भोगून आलेला अभिनेता देखील या सीझन मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी अभिनेता शायनी आहुजा यालाही निमंत्रण पाठवलं आहे.पण अजूनही शायनी आहुजा कडुन कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेलं नाही.शायनी ने जेव्हा बॉलिवूड मध्ये पदार्पण केले त्यावेळी तो खूप मोठा अभिनेता होईल असं प्रेक्षकांना वाटले.गॅंगस्टर,लम्हे,भूभुलैया यासारख्या चित्रपटात शायनी ने काम केले आहे.मात्र हवी तशी प्रसिद्धी त्याला मिळाली नाही.शायनीने त्याच्या मोलकरीण वर केलेल्या बलात्कारामुळे त्याचं संपूर्ण करियर चं नुकसान झालं त्याला अटक करण्यात आले होते.

तब्बल सात वर्षांची शिक्षा त्याला भोगावी लागली.सात वर्षांनंतर तो पुन्हा बाहेर आला.आणि बाहेर आल्यावर लगेचच वेलकम बॅक या चित्रपटांतून पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली मात्र त्यात देखील त्याला यश मिळालं नाही.बिग बॉस पर्वात शायनी येणार का तसंच तो सहभागी झाल्यावर मनोरंजन करेल का हे पाहण्यासाठी रंजक ठरणार आहे.बिग बॉस मध्ये वेगवेगळ्या स्तरावरील कलाकारांना आमंत्रणं देण्यात येते तर आता युट्युबर आशिष चंचलानी यालाही देखील शो मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.

Exit mobile version