spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss16: साजिदने अब्दूच्या पाठीवर लिहिलेला संदेश पाहून नेटकरी संतापले, पहा नेमक काय झालं

बिग बॉस १६ हा कार्यक्रम देशातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये मोठ्या स्थानावर आहे. बिग बॉसचे चाहते हे संपूर्ण देशभरात विखुरलेले आहेत. बिग बॉसच्या घरात अब्दु रोजिक हा एकमेव चिमुकला स्पर्धक आहे. जो घरातील सगळयात लहान आणि सगळ्यांचा लाडका स्पर्धक आहे. तेवढेच नाही तर हा स्पर्धक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. पण आता नुकतच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये असे दिसून आले आहे की साजिद खानाने (Sajid Khan) अब्दु रोजिकचे कपडे काढले आणि त्याच्या पाठीवर एक गलिच्छ संदेश लिहिले आहेत. त्यामुळे नेटकरी साजिदवर चांगलेच संतापले आहेत.

बिग बॉसच्या घरातील साजिद खान हा स्पर्धक कायम चर्चेत असतो. साजिद हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बरेचदा चर्चेत असतो. मागे एकदा साजिदच्या वागण्यावरून आणि वक्तव्यावरून बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan) याने स्वतः साजिदला चांगलेच खडेबोल सुनावले होते. साजिदने आतापर्यंत घरातील सर्वसदस्यांशी वाद घालताना अपशब्द वापरले आहेत. किंवा त्यांना चुकीची वागणूक दिली आहे. पण आता चक्क दिग्दर्शक साजिदने घरातील चिमुकला अब्दूलाही सोडलं नाही. अलीकडेच निम्रत कौर अहलुवालिया हीचा वाढदिवस होता. आणि अब्दूला निम्रत कौर आवडत असल्याने त्याने ठरवलं होत की या वेळेस निम्रत कौरच्या वाढदिवसासाठी काहीतरी खास करायचे.म्हणून अब्दू त्याचे मत शिव आणि साजिद समोर मांडतो आणि त्यांना संगतो की त्याला निम्रतच्या वाढदिवसासाठी काहीतरी वेगळं आणि खास करायचं आहे. अब्दूच्या या प्रस्तावावर साजिद खान आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला एक उपाय सुचवला आणि त्यावर अब्दूने साजिदला नकारही दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdu Rozik FC (@abdurozikfc9)

व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की साजिदने अब्दूच काही ऐकून न घेता शिव सोबत मिळून अब्दूचे कपडेच काढले आणि त्याच्या पुढच्या अंगावर हॅपी बर्थडे निम्मी लिहिले होते आणि त्याच्या पाठीवर अब्दूच्या वयोमाना नुसार अत्यंत वाईट असा संदेश लिहिला होता. ते पाहून शिव ठाकरे , साजिद खान आणि घरातील इतर सदस्य हसताना दिसत आहेत. पण काही नेटकऱ्यानी मात्र यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे तर काहींनी अब्दूची स्तुती करतानाची प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : 

नोरा फतेहीच्या गंभीर आरोपावर जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचं स्पष्टिकरण

राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला गेले असतील?,असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला

Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss