Bigg Boss 16 बिग बॉसच्या घरात प्रियंका चौधरीला ‘देवी’ असे संबोधलं गेलं, पहा नेमकं काय झालं

Bigg Boss 16 बिग बॉसच्या घरात प्रियंका चौधरीला ‘देवी’ असे संबोधलं गेलं, पहा नेमकं काय झालं

बिग बॉस १६ (Bigg Boss 16) हा कार्यक्रम सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात कोणता स्पर्धक काय भूमिका घेईल हे काही सांगता येत नाही. तसेच कार्यक्रमात एखादा स्पर्धक आपल्या सत्तेचा किंवा पदाचा गैरवापर करत असेल अथवा इतर स्पर्धकांना धमकवत असेल तर त्या वेळेस कार्यक्रमाचा हॉट्स सलमान खान (Salman Khan) स्वतः हस्तक्षेप करतो आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा स्पर्धकांची शाळा घेतो. नुकताच बिग बॉसचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यात घरातील सर्वांच्या वतीने होस्ट सलमान खान , प्रियांका चौधरीशी बोलतो आणि बिग बॉसमध्ये बजर न दाबण्याबद्दल तिला प्रश्न विचारतो. आणि तिच उत्तर ऐकून सलमान खानने प्रियंकाला देवी असे संबोधित केलं आहे.

नुकताच कार्ल्स (Colors Tv) वाहिनीने नुकताच एक प्रोमो रिलीज केला आहे. त्यात सलमान (Salman Khan) प्रियांकाला (Priyanka Choudhary) विचारतो, “तुम्ही अंकितला (Ankita Lokhande) लगेच नामांकन मिळण्यापासून वाचवण्यासाठी बजर दाबला नाही. तर, मला सांगा की तुमचा निर्णय इतर स्पर्धकांपेक्षा वेगळा का आहे ?” त्यावर प्रियांका (Priyanka Choudhary) सलमानला सांगते की, “ती तिच्या जिवलग मैत्रिणीचा त्याग करू इच्छित नाहीत्यासाठी प्रियांका रु. २५ लाख रुपयांचा त्याग करायला तयार आहे.” प्रियांकाचे उत्तर ऐकल्यानंतर सलमान म्हणाला, “बर्‍याच दिवसांनी मला घरात एक देवी सापडली जी देवीची प्रार्थना करते. ”

या आठवड्यात बिग बॉस १६ चा होस्ट सलमान खानने (Salman Khan) टीना दत्ताच्या(Tina Datta) नॉमिनेशनवरून एमसी स्टॅन (MC Stan) आणि शालिन भानोत (Shalin Bhanot) यांच्या अलीकडील लढतीबद्दल विचारले.त्या वेळेस एमसी स्टॅनने (MC Stan) शालिनला (Shalin Bhanot) अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सलमानने एमसी स्टॅनला त्याच्या धमकीबद्दल प्रश्न विचारला आणि एमसी स्टॅनने सांगितले की त्याने हे वक्तव्य त्या वेळेस रंगाच्या भरात केला होत. पण त्याचा तास विचार नव्हता.

हे ही वाचा : 

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांची गाडी ४० फूट खोल दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

नाताळ सुट्टीच्या निमित्ताने फिरायला जायचा विचार करताय? मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील सद्यस्थती जाणून घ्या

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version