spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss 16: सलमान खान कायम प्रियांकालाच लक्ष्य करतो ; देवोलिना भट्टाचार्जीने केला आरोप

बिग बॉस १६ मध्ये आतापर्यंत आपण पहिले की या कार्यक्रमात सगळ्याच स्पर्धकांचे एकमेकांबरोबर जोरदार भांडण झाली आहेत. त्यानंतर या शो मध्ये स्पर्धकांच्या पालकांचाही समावेश झाला. स्पर्धकांच्या पालकांनीही केलेल्या वक्तव्यावर जबरदस्त वाद झाले पण त्यानंतर बिग बॉसचे होस्ट सलमान खान यांनी यावरून अलीकडेच स्पर्धकांच्या पालकांना चुकीचे ठरवत खडेबोल सुनावले होते. आपण पाहत आलो आहोत की सलमान खानच आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांवर टीका करत होता. पण, आता तर बिग बॉसच्या माजी स्पर्धक वोलिना भट्टाचार्जी आणि राजीव अडातिया यांनी सलमान खानवर आरोप केले आहेत.

बिग बॉसचे माजी स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी आणि राजीव अडातिया यांनी बिग बॉसच्या घरात चाललेल्या खेळावर प्रतिक्रिया दिली आहे. देवोलिना भट्टाचार्जी आणि राजीव अडातिया यांनी ट्विट केले आहे की टीना दत्तावर तिच्या बिग बॉस १६ मधील कृतीबद्दल टीका का केली जात नाही, तर तिची सह-स्पर्धक प्रियंका चहर चौधरीला अनेकदा होस्ट सलमान खानने लक्ष्य केले आहे, असे म्हणत सलमान खानवर टीका केली आहे.

बिग बॉसचे माजी स्पर्धक राजीव यांनी ट्विट केल की , “सलमान नेहमी प्रियंकाकडे पाहत असतात पण टीना जेव्हा वाईट विधाने करते तेव्हा तो तिला का दुरुस्त करत नाही? प्रियंका टीनापेक्षा खूप चांगला खेळ खेळत आहे. ColorsTV बीबी (बिग बॉस) चांगला असेल! ?” देवोलीनाने राजीव यांची पोस्ट ट्विट करत लिहिले, “उदास झालेलं आहेस का तू? तुम्ही विसरलात की टीनाने बिग बॉसला अनेकदा आठवण करून दिली की ती कलर्स टीव्हीचा ब्रँड आणि चेहरा आहे. प्रियांकाने अजून ते केले नाही.”असे राजीव ने ट्विट केलं. अलीकडेच सलमानने प्रियांकावर अर्चना गौतमशी मैत्री तोडल्याबद्दल टीका केली, तिच या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपट निर्माता साजिद खानशी भांडण झालत्या वेळेसही सलमानने प्रियांकाच्या दोषांवर प्रकाश टाकला.”

सलमानने प्रियांकाबद्दल सांगितलं की जेव्हा अर्चना इतरांबद्दल पाठीमागे वाईट बोलते तेव्हा प्रियांका अनेकदा हसते परंतु जेव्हा ती लोकांच्या चेहऱ्यावर त्याच गोष्टी बोलते तेव्हा प्रियांका काहीच प्रतिक्रिया देत नाही. टीव्हीवर प्रामाणिक दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रीचा त्याग करता असे सलमान खानाने सांगितले.

FIFA WORLD CUP 2022 :यजमान असलेल्या कतार संघाला मोठा झटका; सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

Latest Posts

Don't Miss