Bigg Boss 16 : शिव ठाकरेंमुळे संपूर्ण घरातील सदस्यांच्या डोळ्यात आले अश्रू

Bigg Boss 16 : शिव ठाकरेंमुळे संपूर्ण घरातील सदस्यांच्या डोळ्यात आले अश्रू

बिग बॉस १६ हा कार्यक्रम देशातील लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये मोडला जातो. बिग बॉसचे घर हे एक असे ठिकाण आहे, जिथे दररोज स्पर्धकांच्या संयमाची चाचणी घेतली जाते.त्यात काही पास होतात, तर काहींचा संयम सुटतो. बिग बॉसचा खेळ असा आहे की चांगले मित्र शत्रू बनतात आणि शत्रू मित्र बनतात. तर नुकताच रिलीस झालेल्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य भावुक झालेले दिसत आहे. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या मनातील गोष्टी बोलायला सांगितल्या या दरम्यान सर्व सदस्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले आहे.

नुकतच कलर्स वाहिनीने बिग बॉस १६ या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो त्यांच्या इंस्टाग्राम खात्यामध्ये पोस्ट केला आहे.अगोदर असे वाटत होत की ‘फॅमिली वीक’ टास्क (family week task) अंतर्गत स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येण्याची शक्यता होती. पण आता थोडं वेगळ घडताना दिसत आहे. बिग बॉस १६ च्या नवीन प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, बिग बॉस कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या मनातील भावना शेअर करण्याची संधी देणार आहेत. जेव्हा बिग बॉसने ही संधी दिली तेव्हा घरातील सर्व सदस्य भावूक झालेले दिसले तर शिव ठाकरे आणि प्रियंका जोरजोरात रडतांना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये बिग बॉसने स्पर्धकांना सांगितलं की ‘ खूप दिवस झाले घरातल्यांपासून दुर आहात. चला माझ्यासोबत (बिग बॉस सोबत) मनापासून बोलूया.यादरम्यान ‘जेव्हा शिव कन्फेशन रूममध्ये जातो तेव्हा तो बिग बॉसला सांगतो की , ‘ लोकांना वाटते की तो मनाशी खेळतो. पण तो त्याच्या मनाचे ऐकतो हे शीवच्या कुटुंबीयांना माहीत आहे. घरातील लोकांसमोर रडताही येत नाही,नाहीतर ते शिवला कमजोर समजतील” असे शिवने बिग बॉसला सांगितल. यावेळी शिवा खूप भावूक झालेला दिसला.

त्यानंतर प्रियांका कन्फेशन रूममध्ये जाऊन म्हणते की “ती एक सामान्य मुलगी आहे, तिला लग्न करावं लागेल, सेटल व्हावं लागेल, अंकितच्या बाबतीत ती अधिकच भावूक होत आहे. आणि या सर्व गोष्टींमध्ये तिची चूक होत आहे. तिला पुढे काम मिळेल की नाही याचं टेन्शन तिला कायम असत.पण लोक तिला म्हणतात की ती जास्त चिक-चिक करते.” असे प्रियंकाने बिग बॉसला सांगितलं.

कन्फेशन रूममध्ये अर्चनाचही वेगळचं रुप दिसतं अर्चना गौतमलाही आपले अश्रू आवरता येत नाही. तिचा नंबर आल्यावर तिला रडू कोसळले आणि म्हणाली की आजपर्यंत तिने कोणालाच काही वाईट बोललो नाही आणि या घरात आल्यानंतर ती अशी का झाली हे तिला कळलं नाही. तर प्रियांकाही खूप रडतांना दिसतेय.एकंदरीत आगामी एपिसोड खूपच भावनिक असणार आहे, असं दिसत आहे.

हे ही वाचा :

भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केलीय का?, प्रसाद लाडांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी केला सवाल

भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केलीय का?, प्रसाद लाडांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी केला सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version