Bigg Boss 16, अखेर उद्या होणार बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त पण तितकाच प्रेक्षकांना लोकप्रिय असा कार्यक्रम बिग बॉस १६ (Bigg Boss16) हा संपायला अवघे या काही तसाच शिल्लक राहिले आहेत. या पर्वाचा ग्रँड फिनाले(Grand Finale) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bigg Boss 16, अखेर उद्या होणार बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त पण तितकाच प्रेक्षकांना लोकप्रिय असा कार्यक्रम बिग बॉस १६ (Bigg Boss16) हा संपायला अवघे या काही तसाच शिल्लक राहिले आहेत. या पर्वाचा ग्रँड फिनाले(Grand Finale) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बिग बॉसच्या या पर्वाची टीआरपी (TRP) मध्ये सुद्धा बाजी मारली आहे. या पर्वाची घोषणा या पर्वाच्या सुरवातीलाच करण्यात आली होती ते म्हणजे बिग बॉस स्वतः खेळणार अशी या पर्वाची घोषणा केली होती. आणि हे पर्व यशस्वी होण्यामागे बिग बॉस चा मोलाचा वाटा आहे. या वेळेची बिग बॉस ची हटके खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. जसजसा हा खेळ पुढे गेला तसतसा हा खेळ प्रेक्षकाना कळला. या पर्वातील स्पर्धक,भांडण, टास्क, सलमानची होस्टिंग आणि बिगबॉसची हटके खेळी यामुळे हे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस आले.

बिग बॉस १६ मध्ये मंडलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या मंडलीने बिग बॉस मराठी २ विजेता शिव ठाकरे आणि रॅपर एमसी स्टॅनची सुंदर दोस्ती पाहायला मिळाली. सिनेमा निर्माता साजिद खान, इंटरनॅशन सिंगर अब्दू या मंडलीचे सदस्य होते. या मधील शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेच टॉप- ५ मध्ये पोहोचले आहेत आणि दुसरीकडे शालीन, प्रियांका आणि अर्चना सुद्धा हा खेळ खेळत टॉप – ५ मध्ये पोहोचले आहेत. या ब्लॉकबस्टर पर्वाचा कोण विजेता होणार हे पाहण्यासाठी सर्वच प्रेकक्षक उत्सुक आहेत. बीगबॉसचे १५ पर्व पार पडले होते त्यातले १३ वे पर्व हे प्रेक्षकांची मने जिंकून त्या पर्वामध्ये सिद्धार्थ शुक्ला ने बाजी मारली होती. त्यानंतर १६ वे पर्व हे वेगळे ठरले आहे.

बिग बॉस १६ वे पर्वाचा विजेता घोषित करण्यासाठी काही तसाच शिल्लक आहेत. बिगबॉस १६ चा विजेता जाहीर करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता या पर्वाचा शेवटचा भाग टेलिव्हिजन वर येणार आहे. त्या आधीच रोहित शेट्टी त्याचा शो खतरो के खिलाडी साठी बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी प्रवेश करून त्यांची निवड करणार आहे. त्यामधील एक खेळाडू शिव ठाकरे आणि दुसरी म्हणजे अर्चना गौतम असू शकते. बिग बॉस मराठी विजेता महारष्ट्राची शान शिव ठाकरे बिग बॉस १६ जिंकावा अशी चाहत्यांची उच्च आहे. शिव ठाकरे च्या आईने असा विश्वास व्यक्त केला आहे कि तोच बिग बॉस १६ चा विजेता होणार.

हे ही वाचा : 

‘काऊ हग डे’ वर उर्फी जावेद म्हणाली…

तानाजी सावंतांची जीभ घसरली, आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version