Bigg Boss 16 निमृत कौरच्या मानसिक आजाराची खिल्ली उडवल्याबद्दल शालीन भानोतवर करणार खटला दाखल

Bigg Boss 16 निमृत कौरच्या  मानसिक आजाराची खिल्ली उडवल्याबद्दल शालीन भानोतवर करणार खटला दाखल

आतापर्यंत बिग बॉस १६ च्या घरातेल स्पर्धकांमध्ये अनेक वाद होताना दिसले आहेत. पण नुकत्याच रॅलीज झालेल्या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धकांमध्ये होणाऱ्या वादाला कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. या प्रोमोत शालिनने आणि टिनाला अलीकडे केलेल्या मदतीची जाणीव करून दिली आणि त्याबदल्यात शालिनने टिनाची मदत मागितली यावर निमृत कौरने शालिनच वागणं चुकीचे असल्याचे सांगितले यानंतर शालिनने निमृतला असलेल्या मानसिक आजारावर तिची खिल्ली उडवले. मग निमृतीने शालिनला धमकावले की पुन्हा असे झाल्यास षांच्या विरोधात खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली आहे.

नुकताच रिस्लीस झालेल्या बिग बॉस १६ च्या प्रोमोमध्ये पुन्हा स्पर्धकांमध्ये भांडण होताना दिसले आहे. प्रोमोत असे दिसून आले आहे की टिना शालीन भानोतला बोलते की त्याने तिला पाठिंबा दिला आहे आणि तिला शालिनने केलेल्या मदतीची परतफेड करण्याची हीच वेळ आहे असे टिनाने शालिनला सांगितले. टिना शालीन भानोतला पुढच्या टास्क मध्ये मदत करणार असल्याचे सांगितले आहे. तर त्यावर टास्कच्या नियमानुसार हे शक्य आहे का असा साजिद खानाने प्रश्न उपस्थित केला. यावेळेस निमृत शालिनला म्हणाली, “चांगलं नाही दिसणार भावा” आणि तो म्हणाला, “काय चांगलं दिसेल आणि काय चांगलं दिसणार नाही ते मी तुला नंतर सांगेन.”यावर निमृतने त्याला विचारले, “तुला काय प्रॉब्लेम आहे?”नंतर शालिनने निमृतवर आरोप केले आणि तिला सांगितले, “मला खूप समस्या आहेत,मला मानसिक समस्या आहेत, माझ्याकडे हे सर्व आहे.” असे म्हणत शालिनने निमृतच्या मानसिक आजारावर भाष्य केले यानंतर निमृत त्याला म्हणाली,”शालीन तू असा माणूस आहेस जो कोणाच्या तरी आजाराची चेष्टा करतो . तुझे वास्तव आता उघड झाले आहे.” नंतर, ती त्याच्यावर ओरडताना आणि स्वतः रडताना दिसली, “शालिनने आता त्याचे वास्तव उघड केले आहे. पुढच्या वेळी,जर शालिनने निमृतच्या मानसिक आजाराची पुन्हा चेष्टा केली ,तर निमृत शालीन विरोधात दावा दाखल करेल.”

तर आता पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे की शालीन पुन्हा निमृतच्या मानसिक आजारावर भाष्य करणार का आणि जर त्याने पुन्हा असे भाष्य केले तर निमृतची प्रतिक्रिया काय असेल. तसेच जर या वादाला कायदेशीर वळण लागलं तर कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान देखील यात भरडला जाऊ शकतो मग आता पुढे या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळण्याच्या आधी सलमान खान या प्रकरणावर प्रतिक्रिया देईल के नाही हे सुद्धा बघण्यासारखं असेल.

हे ही वाचा : 

“छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र व राज्याकडून बक्षिस?”, मंत्री लोढांच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

“छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र व राज्याकडून बक्षिस?”, मंत्री लोढांच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

World Aids Day 2022 : आजाराला न घाबरता सामोरे जा, HIV आणि AIDS बद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक एड्स दिन’

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version