spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Bigg Boss 16’चा विजेता MC Stan नक्की कोण आहे?

काल 'बिग बॉस 16' चा महाअंतिम सोहळा हा काळ दि. १२ फेब्रुवारी रोजी पार पडला. या सोहळ्यात 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) विजेतेपदावर पुण्याच्या एमसी स्टॅनचं (MC Stan) नाव कोरलं आहे.

काल ‘बिग बॉस 16’ चा महाअंतिम सोहळा हा काळ दि. १२ फेब्रुवारी रोजी पार पडला. या सोहळ्यात ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) विजेतेपदावर पुण्याच्या एमसी स्टॅनचं (MC Stan) नाव कोरलं आहे. अल्ताफ शेख (Altaf Shaikh) हे एमसी स्टॅनचं खरं नाव आहे. एमसी स्टॅनला लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. त्याला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण ‘वाता’ या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर २१ मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत.

अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षी एमसी स्टॅनने कव्वालीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच २३ वर्षाचा हा एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एमसी स्टॅन हा एका गरीब कुटुंबात जन्मलेला आहे. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्याच्या गाण्यांमुळे इतर लोकांसह त्याच्या कुटुंबियांनीदेखील त्याला टोमणे मारले आहेत. पण अजिबात न डगमगता त्याने या कलेची आवड ही जोपासली आहे. आणि आता तो एक प्रसिद्ध रॅपर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

 त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात ही ‘समझ मेरी बात को’ या गाण्याच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्याचे ‘अस्तगफिरुल्ला’ (Astaghfirullah) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याच्या माध्यमातून त्याने त्याचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या आर्थिक अडचणी आणि भूतकाळावर भाष्य केलं. या गाण्यामुळे एमसी स्टॅनकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला. तर ‘तडीपार’ या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. ‘बिग बॉस 16’च्या प्रीमियरला तो ७० लाख किंमत असलेला नेकपीस आणि ८० हजार रुपयांचा शूज घालून आला होता. गेल्या तीन-चार वर्षांत त्याने नाव आणि खूप पैसा कमावला आहे.

हे ही वाचा : 

महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती…… शरद पवारांचे वक्तव्य

काँग्रेसमध्ये सुरु झाले अंतर्गत द्वंद्व, नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss