बिग बॉस मधील ‘या’ स्पर्धकाला मिळणार सिनेमात झळकण्याची संधी

बिग बॉस मधील ‘या’ स्पर्धकाला मिळणार सिनेमात झळकण्याची संधी

बिग बॉस १६ (Bigg Boss) हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. तसेच बिग बॉसमध्ये (Bigg Boss) भाग घेणारे स्पर्धकांची भूमिका काय असेल किव्हा ते कधी काय करतील हे कॊणालाही सांगता येत नाही. पण बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan) हा एक अभिनेताच नसून अनेक कलाकारांचा गॉडफादर देखील आहे. सलमान खान (Salman Khan) याने बऱ्याच कलाकारांना सिनेमांमध्ये काम मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्याच प्रमाणे बिग बॉसमध्ये (Bigg Boss) भाग घेणाऱ्या कलारकरांना देखील सलमान खान (Salman Khan) हा सिनेमामध्ये काम करण्याची संधी देतो.सलमान याने अभिनेत्री शहनाज गिला (Shehnaaz Gill ) हिला सुद्धा आगामी सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. त्याचप्रमाणे सलमान खान हा बिग बॉसच्या घरातील अजून एका अभिनेत्रीला सिनेमात काम करण्याची संधी देणार आहे.

कलर्स वाहिनेने नुकताच प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये दिसत आहे की बिग बॉस १६’ शोच्या ‘विकेंड का वार’ दरम्यान साजिद खान (Salman Khan) याने ‘सिनेमात कोणाला संधी देणार?’ असा प्रश्न सलमान खानला (Salman Khan) विचारला.यावर सलमानने सांगितले की , ‘साजिद तुला माहिती आहे बिग बॉसच्या प्रत्येक सीजनच्या स्पर्धकासोबत मी काम करतो. आता अशी संधी मिळाली तर मला प्रियंकासोबत (priyanka choudhary) काम करायला आवडेल. तसेच सलमान प्रियंकाबद्दल (priyanka choudhary) पुढे म्हणाला, ‘प्रियंकाचं भविष्य उज्वल आहे. तिच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. पुढे जावून प्रियंका टॉप अभिनेत्री होवू शकते.’ असं सलमानने प्रियंकाबद्दल मत व्यक्त केलं आहे. सलमान खानच्या वक्तव्यानंतर प्रियंका कोणत्या सिनेमात झळकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रियंका चाहर चौधरी (priyanka chahar choudhary) बिग बॉसच्या घरातील मुख्य स्पर्धकांपैकी एक आहे. पण सलमान खानाने केलेलं कौतुक ऐकून प्रियंका प्रचंड आनंदी झालेली दिसते आहे. पण या आधी सलमान अनेकदा प्रियंकाला सल्ला दिला आहे की, तुझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही बदल कर, तू भविष्यात पुढे जाशील. त्यावर प्रियांकामध्ये बदल घडलेला दिसत आहे. म्हणूनच आता सलमानने प्रियंकाला स्वतःच्या चित्रपटात घ्यायचे ठरवले असावे. तर आता प्रियंका कोणत्या चित्रपटात झळकणार आहे . हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

संभाजी महाराज धर्मरक्षक, शिवेंद्रराजे भोसले यांचा अजित पवारांवर टीका

ब्रिजभूषण सिंह यांनी बाळगलं मौन

ससुराल सिमर का फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version