spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : ‘ऑल इज वेल’ म्हणत ‘बिग बॉस’चं दार उघडलं

टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेतील शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त, लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून या शो ने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेतील शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त, लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून या शो ने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मराठी बिग बॉसच्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. यावेळी शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत असल्याचे बोलले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित असून बिग बॉस मराठीतील अनेक स्पर्धकांची नाव जाहिर झाली आहेत.

देवमाणूस फेम तेजस्विनी लोणारी, अभिनेता प्रसाद जवादे, मुंबईचा निखिल राजेशिर्के आणि कोल्हापूरची अमृता धोंगडे, ‘सातारी बाणा’ किरण माने, ‘स्प्लिट्सविला’ फेम समृद्धी जाधव, अक्षय केळकर, रोडीज फेम योगेश जाधव, पुण्याची ‘टॉकर’वडी अमृता देशमुख, ऑटो राणी यशश्री मसुरकर, डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, अभिनेत्री रुचिरा जाधव आणि नृत्य दिग्दर्शक रोहित शिंदे हे स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 भांडण, दंगा, आणि प्रेमाने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. अखेर एक घर, १०० दिवस आणि १६ स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

अनेक कलाकार मंडळी बिग बॉसच्या (Big Boss Season 4) घरातून आपल्या अभिनयाची सुरुवात करतात. काहींना चांगली ओळख प्राप्त होते तर काहींना इतकी खास ओळख प्राप्त होत नाही. प्रेक्षकवर्ग जितकी मालिका आवडीने बघतात तितक्याच आवडीने बिग बॉसला ही पसंती देतात. प्रेक्षकवर्ग जेवढा हिंदी बिग बॉससाठी (Bollywood) आतूर असतो, तितकाच प्रेक्षकवर्ग हा मराठी बिग बॉसला ही आतूर असतो. आत्ता पर्यंत मराठीमध्ये बिग बॉसचे तीन सीजन पार पडले. जितका तीन सीजनला भरभरून प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद किंबहूना त्याहून अधिक प्रतिसाद चौथ्या सीजनला मिळण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षक कलर्स मराठीवर सोम-शुक्र रात्री १० वा. आणि शनि-रवि रात्री ९.३० वाजता पाहू शकतात.

हे ही वाचा:

Iranian Passenger Jet : इराणहून चीनकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, एजन्सी सतर्क

Milind Narvekar: शिंदे गटात सामिल होण्याच्या चर्चेला मिलिंद नार्वेकरांनी लावला पूर्णविराम, एक सूचक ट्वीट करत म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss