Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अमृता फडणवीसांची एण्ट्री; कोणता ट्विस्ट येणार?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात .

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अमृता फडणवीसांची एण्ट्री; कोणता ट्विस्ट येणार?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात . संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह असताना बिग बॉसच्या घरातही हा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात खास पाहुणीला आमंत्रित करण्यात आलं आहे. ही पाहुणी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis). अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत घरातील सदस्य मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये येणार आहेत समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस. आज घरामधील स्पर्धक अमृता फडणवीस यांच्या साथीने साजरा करणार दिवाळी सण. बिग बॉस यांनी जाहीर केले, आज घरात येणार आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस. त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्न देखील विचारले. यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हजेरी लावली कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी – राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले साप्ताहिक कार्य. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि त्याची विजेती ठरली TEAM A.

बिग बॉस मराठीच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अमृता फडणवीस यांनी ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्यावर ठेकासुद्धा धरला. बिग बॉसच्या घरातील ही धमाल मजा प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री ९.३० वाजता पहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

राणा माझा भाऊ कधीही नव्हता. किरीट सोमय्या माझा भाऊ आहे – किशोरी पेडणेकर

“प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version