spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 प्रसाद जवादेची आई घरात येताच सर्व सदस्यांच्या डोळ्यात आले आश्रू ,पहा नेमकं काय झालं

सध्या बिग बॉस मराठीचं चौथ (Bigg Boss Marathi 4 ) पर्व येत्या काही दिवसातच संपणार आहे. पण या पर्वाच्या शेवटी सुद्धा प्रेक्षकांसाठी आणि स्पर्धकांसाठी अनेक ट्विस्ट आपल्याला दिसत आहेत. या आठ्वड्यात बिग बॉसच्या घरात फॅमिली विक सुरु आहे. त्यात इतके दिवस बिग बॉसच्या घरातील अनेक सदस्य हे त्याच्या कुटुंबियांपासून दूर आहेत. त्यामुळे या फॅमिली विक मध्ये आपल्या कुटुंबियांना पाहून बिगबॉसच्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्य हे भावुक होताना दिसले आहेत. त्यात प्रसाद जवादेच्या ( Prasad Jawade) आईने घरात येताच सर्व सदस्यांना आपलस करून घेतला आणि त्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात आश्रू आलेत.

सध्या बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 4 ) घरात फॅमिली विक सुरु आहे. कलर्स मराठी वाहिनीवर नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये प्रसाद जवादेचे (Prasad Jawade) वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. या प्रोमोत बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांचे मुलं , काही सदस्यांच्या पत्नी तर काही सदस्यांचे आई आणि वडील येताना दिसाले आहे. यावेळेस प्रसाद जवादेच्या आईने घरातील सर्व सदस्यांना आपलासा करून घेतल. प्रोमोत असे दिसत आहे की प्रसाद त्याच्या विचारांमध्ये रामला आहे. त्याला काही सुचेनासं झालं आहे. पण जेव्हा त्याने त्याच्या आई आणि वडिलांना बिग बॉसच्या घरात येताना पहिला तेव्हा त्याच वेगळाच रूप दिसल आहे. प्रसाद त्याच्या आईच्या आईच्या कुशीत जाऊन रडताना दिसला आहे. या वेळेस प्रसादच्या आईने प्रसाद सह घरातील सर्व सदस्यांना एक कविता ऐकवताना दिसत आहे. आणि या वेळेस प्रसाद जवादेच्या आईने सर्व सदस्यांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. प्रसादच्या आईने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना “इतरांना माफ करायला शिका” असे सांगत सर्व सदस्यांना मोलाचा सल्ला दिला. तसेच प्रसादच्या आईने घरातील सर्व सदस्यांना आपलस करून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या प्रोमोमध्ये घरातील स्पर्धकांच्या आणि स्पर्धकांचं वेगळ रूप आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर बिग बॉसच्या या येत्या भागात आपल्याला काय होणार आहे हे लवकरच कळेल. तसेच सर्वच प्रक्षकांना उत्सुकता लागली आहे कि बिग बॉस मराठीच्या या चौथ्या पर्वाचा विजेता कोण असेल.

हे ही वाचा:

मुंबई इंडियन्सला मिळाली कायरन पोलार्डची रेप्लासिमेंट

Indian Army मोठी बातमी! भारतीय सैन्याची बस दरीत कोसळली, १६ जवानांचा मृत्यू

IPL Auction 2023 पहा कोणते खेळाडू लिलावात राहिले अनसोल्ड !, जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss